Just another WordPress site

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देवस्थानांच्या ठिकाणी मास्कसक्ती होणार – राधाकृष्ण विखे

अहमदनगर : चीन या देशात करोनाचा हाहाकार सुरू झाला असून त्याचा प्रसार भारतात आणि महाराष्ट्रात होऊ नये यासाठी प्रशासकीय पातळीवर सतर्कता बाळगण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे महसूलमंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री यांनीही अहमदनगर जिल्ह्यात तातडीने करोना प्रोटोकॉल लागू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच अहमदनदर येथील देवस्थानांच्या ठिकाणी मास्कसक्तीच्या सूचनाही लवकरच देण्यात येतील असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे पत्रकार परिषदेत बोलत होते. वाढत्या करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला काही निर्देश दिलेले आहेत. करोना संदर्भात मी जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे. पूर्वी आपण करोनाचा प्रोटोकॉल राबवत होतो, तोच प्रोटोकॉल तातडीने लागू करण्याच्या सूचना मी दिल्या असल्याचे विखे पाटील म्हणाले.

तशी जिल्ह्यात पॅनिक व्हावे अशी स्थिती नाही, मात्र आपण उद्या मग ते वाढल्यानंतर नियंत्रण करायला जातो. तसे होऊ नये म्हणून आपण जुनाच प्रोटोकॉल तत्काळ लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यात आयसीयूची संख्या वाढवणे, बेडची संख्या वाढवणे, पुरशा ऑक्सिजनची उपलब्धता ठेवणे अशा गोष्टींचा समावेश आहे. हा प्रोटोकॉल पुढील ५ ते ७ दिवसात कार्यान्वित करून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची सरकारची तयारी आहे, त्यासाठी सर्व यंत्रणा तयार आहेत आणि अशा प्रकारची कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत असे विखे पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!