Just another WordPress site

“आम्हाला मिळाले पन्नास खोके….” शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची कबुली!

सातारा : शिवसेनेत बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेल्या सर्वच आमदारांविरोधात ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशी घोषणाबाजी विरोधक सतत करत असल्याचे दिसून येते. आता याच घोषणेबाबत शिंदे गटातील आमदाराने भाष्य केले आहे. “आम्हाला मिळाले असतील पन्नास खोके पण तुमच्या पोटात का दुखतंय ? असा सवाल आमदार महेश शिंदे यांनी केला आहे. साताऱ्यात एका सभेदरम्यान ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले. त्यानंतर सेनेतून बंडखोरी केलेल्यानावर पैशाचा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आला. त्यामुळे पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा देण्यास विरोधकांनी सुरुवात केली. साताऱ्यात ग्रामपंचायतीत विजयी झालेल्या सदस्यांच्या अभिनंदनासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना महेश शिंदे यांनी विरोधकांना पन्नास खोक्यांवरून तुमच्या पोटात का दुखतंय असा सवाल केला.

खोके म्हणाले की सर्वांच्या मनात पापच येत. आम्हाला पन्नास मिळाले तुमच्या का पोटात दुखत,आम्ही वाटतो की लोकांच्यात…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला पन्नास खोके प्रेमाचे दिलेत असं स्पष्ट मत यावेळी आमदार शिंदे यांनी व्यक्त केलं. तसेच तुमच्या नेत्यांना लवासातून खोके मिळतात अशी टीका देखील शिंदे यांनी यावेळी केली. आयोजित कार्यक्रमात नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार देखील करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!