Just another WordPress site

शेतात काम करणाऱ्या व्यक्तीचा हा व्हिडिओ पाहाल तर थक्क व्हाल, पाहा कसा भरतो ट्रकमध्ये टोमॅटो; हा माणूस आहे की रोबो?

अनेकजण आपल्या शेतामध्ये काम करत असताना ते काम मनापासून आणि वेगवेगळ्या कल्पनात्मक पद्धतीने करत असतात. शिवाय सततच्या सरवामुळे एखाद्या कामात माणूस किती तरबेज होतो याचं उदाहरण दाखवणारा एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ एका टोमॅटोच्या शेतात काम करणाऱ्या व्यक्तीचा असून यामध्ये तो आपल्या शेतामधील टोमॅटो एका ट्रकमध्ये भरताना दिसतं आहे. मात्र, तो ज्या पद्धतीने टोमॅटो ट्रकमध्ये भरत आहे ते पाहून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल. हो कारण हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येकच असंच म्हणत आहे की, हे अफलातून आहे.

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना एवढा आवडला आहे की या व्हिडिओला जवळपास १० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. एका सागर नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून त्यांने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, “पॉवर ऑफ अरनॉल्ड, ब्रेन ऑफ आईन्स्टाईन, हे वाचून आमच्यावर विश्वास नाही? स्वत: साठी पहा असं आवाहन त्याने ट्विटद्वारे केलं असून त्याप्रमाणे नागरिकांना तो व्हिडीओ पाहिला देखील आहे.

या व्हिडीओमधील एक माणूस टोमॅटोने ट्रक भरताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये आपणाला एक माणूस अगदी रोबोटप्रमाणे एका रांगेत तो काम करताना दिसत आहे. या क्लिपला तब्बल १० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेतच. शिवाय त्या माणसाचे कौशल्य पाहून लोकं आश्चर्यचकित झाले असून आपले काम सहजतेने पूर्ण केल्याबद्दल तो बक्षीसासाठी कसा पात्र आहे याबद्दल अनेकांनी ट्विटच्या कमेंटमध्ये लिहिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!