Just another WordPress site

तुमच्याकडे वाहनाचा ‘हा’ महत्त्वाचा कागद नसेल तुम्हाला गाडीत भरता येणार नाही पेट्रोल-डिझेल, २५ ऑक्टोबरपासून लागू होणार नियम

रस्त्यावर वाहणं चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असते. ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आपल्याला दंड पडू शकतो. मात्र, बऱ्याचदा गाडीसोबत कागदपत्र ठेवणं टाळाटाळ केली जाते. कधीकधी ऑनलाईन सर्टिफिकेट ठेवली जातात. तर काही कागदपत्रांची मुदत संपली की नाही हे पाहायची देखील आठवण राहात नाही. मात्र आता हे सगळे नियम सणासुदीच्या काळात अधिक कठोर करण्यात आले.

 

महत्वाच्या बाबी

१. आता वाहन चालवताना पीयूसी सर्टिफिकेट सोबत ठेवा
२. तुमच्याकडे पीयूसी नसल्यास बसू शकतो १० हजारांचा भूर्दंड
३. दिल्लीत पीयूसीशिवाय मिळणार नाही पेट्रोल-डिझेल
४. येत्या २५ ऑक्टोबरपासून लागू होतोय नवीन नियम

 

पूर्ण देशभरात परिवहन विभागाकडून रहदारीचे नियम कठोर केले जात आहेत. तुम्ही जर दिल्लीतले रहिवासी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. प्रदूषणाशी दोन हात करण्यासाठी दिल्ली सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं. दिल्लीत ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात हवेचे प्रदूषण गंभीर पातळी गाठते. त्यामुळं सरकारने वाहतुक नियमात काही महत्वाचे बदल केले. वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी दिल्ली परिवाहन विभागाने पीयूसीशिवाय वाहन चालवणाऱ्याविरोधात कारवाई सुरु केली. त्यासोबतच आता पेट्रोल पंपावरही पीयूसी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलंय. येत्या २५ ऑक्टोबरपासून पीयूसीसी प्रमाणपत्र असणाऱ्या वाहनांना राजधानीत इंधन मिळणार आहे. यासंदर्भातील आदेश आज दिल्ली सरकारने पेट्रोलपंप धारकांना दिले. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वाहतूक शाखेकडून जारी केले जाते. वाहतूक खात्याने यासंदर्भात नोटीस जारी करत इलेक्ट्रिक आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या वगळून एका वर्षापेक्षा जुन्या असलेल्या गाड्या मालकांनी तत्काळ पीयूसी प्रमाणपत्र काढावे, असे निर्देश दिले. वाढते प्रदूषण लक्षात घेता केजरीवाल सरकारने प्रदूषण करणाऱ्या गाड्यांना चाप लावण्यासाठी कडक निर्णय घेतला. दिल्लीतल्या पीयूसीशिवाय धावणाऱ्या वाहन चालकांकडे पीसूसी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला १० हजार रुपयांचा दंड आणि याशिवायपेट्रोल-डिझेल देखील मिळणार नाही असा नियम काढण्यात आला. यात ६ महिन्यांचा तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आली. याबाबतचं नोटिफिकेशन लवकरच जारी केलं जाईल, असं दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले.

याशिवाय, २५ ऑक्टोबरनंतर अधिकृत पीयूसी असलेल्या वाहनांना इंधन विकावे आणि तशी सूचना पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पंपधारकांना देण्यात आल्या. दिल्ली परिवहन विभागाने वाहन मालकांना गैरसोय आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी निर्धारित तारखेपूर्वी वैध PUCC प्राप्त करण्यास सांगितले आहे. आठवडाभरात पीयूसीसी प्रमाणपत्र काढून घेतले नाही तर गाडीची नोंदणी देखील रद्द होऊ शकते, अशी तंबीही या नोटीफिकेशनमध्ये देण्यात आली. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केजरीवाल यांचं सरकार प्रयत्न करतंय. त्याचाच भाग म्हणून आता वाहन धारकांकडे PUC सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. २५ ऑक्टोबरपासून प्रत्येक पेट्रोल पंपावर हे सर्टिफिकेट दाखवल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही असा नियम आणला आहे. महत्वाचं म्हणजे, हा नियम जरी सध्या दिल्लीपुरता असला तरी पुढच्या काही महिन्यात मुंबई आणि महाराष्ट्रात यायला वेळ लागणार नाही.

दरम्यान, दिवाळीआधी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. महागाई वाढत असताना तुमच्या खिशाला तुमच्याच चुकीने भुर्दंड पडणार नाही यासाठी PUC सर्टिफिकेट काढलं नसेल तर काढून घ्या.

 

PUC Certificate कसं काढायचं?

Online PUC Certificate बनवता येत नाही, कारण प्रदूषण चाचणी केंद्रावर वाहनाची तपासणी केल्यानंतरच कोणत्याही वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते. तुम्हाला जर PUC Certificate सर्टीफिकेट काढायचे असेल तर तुम्हाला तुमचं वाहण PUC Center वर न्यावं लागेल.
तेथे गेल्यानंतर वाहन तपासणी केंद्राचे कार्यकारी अधिकारी तुमच्या वाहनाचे प्रदूषण तपासतात की तुमचे वाहन किती प्रदूषण दूर करत आहे. त्यानुसार तुम्हाला पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!