Just another WordPress site

‘मी मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च करू शकत नाही, खर्च करूनही मराठा समाजातील मुलांना नोकरी मिळत नाही’, अशी चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

बीड : शेतकरी आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, दुष्काळ, अशा विविध कारणांमुळे अनेक शेतकरी त्रस्त असतात. अनेकजण या संकटातून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तर बरेच शेतकरी सततच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलतात. हे वास्तव अतिशय धक्कादायक आहे. आता बीडमधून नुकतीच एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

बीडमधील या घटनेत मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपत असल्याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये करत एका शेतकऱ्याने आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहिली आहे. ज्यामध्ये आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे, की ‘मी माझ्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च करू शकत नाही. खर्च करूनही मराठा समाजातील मुलांना नोकरी मिळत नाही. मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे’. अशी चिठ्ठी लिहून बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगरी गावच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे

दादा डिसले असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण देता येत नाही आणि त्यावर बेरोजगारी अशा कारणांनी बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगरी गावचे शेतकरी दादा डिसले यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर सुसाईड नोट समोर आली आहे. त्यात दादा डिसले यांनी मराठा आरक्षण नसल्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!