Just another WordPress site

ब्रेक के बाद! तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर नाना पाटेकर यांचे दमदार पदार्पण! ‘लाल बत्ती’मध्ये साकारणार महत्वाची भूमिका

मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित करणारे अभिनेते नाना पाटेकर गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून गायब आहेत. पण आता नाना पाटेकर हे प्रकाश झा यांच्या आगामी सीरिजच्या माध्यमातून कमबॅक करत आहेत. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून ते मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. पण आता लवकरच ते प्रकाश झा यांच्या आगामी ‘लाल बत्ती’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहेत.

 

महत्वाच्या बाबी

१. नाना पाटेकरांचं मनोरंजनसृष्टीत कमबॅक
२. नाना पाटेकर पुन्हा ओटीटीवर दिसणार
३. ‘लाल बत्ती’मध्ये साकारणार महत्वाची भूमिका
४. ‘लाल बत्ती’त नानांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक

 

नाना पाटेकर हे चित्रपटसृष्टीतील सर्वात अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत आणि हे नाकारता येणार नाही. हिन्दी, मराठी, नाटक, चित्रपट अशा अनेक माध्यमातून त्यांनी आपली अभिनयाची कारकीर्द संपन्न केली. त्यांचे आज लाखो चाहते आहेत शिवाय त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चित्रपटांमधील आपल्या उत्कृष्ट अभिनयानंतर नाना आता वेब सिरीजच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यावर झालेल्या ‘मी टू’ आरोपानंतर प्रदर्शित होणारा हा त्यांचा पहिला प्रोजेक्ट आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने २०१८मध्ये नाना पाटेकर यांच्यावर ‘मीटू’ अंतर्गत लैंगिक छळाचा आरोप केला होता. २००८मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. त्यावेळी तिने केलेल्या आरोपांवर मोठी खळबळ माजली होती. या आरोपांचा नाना पाटेकरांच्या कारकिर्दीवरही परिणाम झाला. दरम्यानच्या काळात या आरोपांमुळे काही चित्रपट त्यांच्या हातून निसटले. यानंतर मात्र त्यांनी मनोरंजन विश्वातून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. पण आता मात्र त्यांनी दमदार कमबॅक केला आहे. पुन्हा एकदा नव्या अंदाजाने वेब सिरिजच्या माध्यमातून नाना पाटेकर आपल्या अभिनयाची छाप पाडण्यासाठी सज्ज झाले आहेत. जवळपास दोन वर्षांनंतर ते प्रकाश झा यांच्या लाल बत्ती या वेब सीरिजमधून पुनरागमन करणार आहेत. या वेब सीरिजद्वारे नाना पाटेकर ओटीटीवर पदार्पण करणार आहेत.

 

लाल बत्ती’ ही एक सामाजिक आणि राजकीय कथानकावर आधारित वेब सीरिज असणार आहे. विशेष म्हणजे, ही नानांची पहिली वेब सिरिज आहे. नानांचे चाहते डिजिटल क्षेत्रात त्याच्या पदार्पणाची वाट पाहत आहेत. ह्या निमित्ताने चाहत्यांची ती इच्छा पूर्ण झाली. ‘लाल बत्ती’ ही राजकीय विषयांवर भाष्य करणारी ही वेबसीरिज आहे. या वेबसीरिजच्या माध्यमातून राजकारणातील काही काळी सत्य उघडकीस येणार आहेत. नाना यामध्ये वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री मेघना मलिक, नाना पाटेकर यांच्या विरुद्ध भूमिकेत दिसणार आहे. त्या नानांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याआधी मेघना मलिका ‘मिर्झापूर’, ‘अरण्यक’ आणि ‘बंदिश डाकू’ या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

दरम्यान, ‘लाल बत्ती’ ही नानांची प्रकाश झा सोबतची दुसरी कलाकृती आहे. यापूर्वी ‘राजनीती’ चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. ‘लाल बत्ती’ वेबसीरिजमध्ये नानांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!