Just another WordPress site

सरकारी फर्मान! फटाके फोडाल तर खबरदार..! फटाके फोडल्यास होईल ३ वर्षांचा तुरुंगवास

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत फटाक्यांवर आधीपासून बंदी होतीच, आता सरकारने आणखी एक फर्मान काढून दंडाची घोषणा केली आहे. राजधानीत कोणीही फटाके फोडताना आढळल्यास त्याला २०० रुपये दंड ठोठावला जाईल, आणि ६ महिने तुरुंगवासही भोगावा लागू शकतो, असा आदेश दिल्ली सरकारने काढला आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 

साठवण करणाऱ्यांना ३ वर्षांची शिक्षा

फटाके फोडणाऱ्यांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासासह २०० रुपये दंड आकारला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर जो कोणी फटाक्यांची साठवणूक करतो, किंवा विक्री करतो, अशांना ५००० रुपयांपर्यंतचा दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो. या आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सरकारने ४०८ ग्रुप तयार केले आहेत.

 

अनेक टीम्स तयार

सहाय्यक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, दिल्ली पोलिसांच्या २१० टीम्स, आयकर विभागाच्या १६५ टीम्स आणि दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या ३३ टीम तैनात केल्या जाणार आहेत. गोपाल राय यांनी सांगितले की, दिल्लीत लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ‘दिवे लावा, फटाके फोडू नका’ ही मोहीम सुरू केली जाईल. कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये सरकार स्वतः 51 हजार दिवे लावणार आहे.

 

किती दिवस बंदी कायम राहणार?

सरकारच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत २,९१७ किलो फटाके जप्त केल्याची माहितीही राय यांनी दिली. विशेष म्हणजे, सरकारचा हा आदेश पुढील वर्षी 1 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केजरीवाल सरकारकडून हे पाऊल उचलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!