Just another WordPress site

“आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर जोरदार निशाना

अमरावती : काही ठिकाणी मतं मिळवण्यासाठी नेत्यांना रक्ताची आहुती द्यावी लागते. मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता. राजकीय मंडळींनी दान करण्याची प्रवृत्ती ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर येथे आधी खिसे कापणारे आणि मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असा सवाल करत आमदार बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी राणा दाम्पत्याला खोचक टोला लगावला आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet rana) आणि आमदार रवी राणा यांनी दिवाळीनिमित्त मतदारसंघातील गरीब कुटूंबांना किराणा वाटपाची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मतदारसंघातील जवळपास एक लाख लोकांना किराण्याचे वाटप केले जाणार असल्याचे राणा दाम्पत्याने जाहीर केले आहे. यावरून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे जनप्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीकास्र सोडले आहे. ते अमरावती येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी बच्चू कडू म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. मात्र,आपण या अधिकाराचं पतन करत पुन्हा किराणा देणाऱ्याला निवडून देतो,अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. गोरगरीबांचे खिसे कापायचे,त्यांच्या खिशात हात घालायचा. लोकशाहीचं पतन करायचं. राजकारणाची ऐशी की तैशी करायची, असले नेते आपल्यात कमी नाहीत. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचं पतन करत आम्ही पुन्हा किराण्यावर निवडून येतो,असं सांगणाऱ्या महाठगाला सुद्धा आपण पाहतोय,अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. त्यांनी अप्रत्यक्ष राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!