Just another WordPress site

सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने कुऱ्हाडीने वार करून केली मेहुण्याची हत्या,

औरंगाबाद : सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्यामुळे औरंगाबाद हादरलं आहे. औरंगाबाद-पुणे महामार्गावर भर दिवसा युवकावर कुऱ्हाडीने वार करून त्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मेहुण्याची हत्या केली आहे. दहेगाव बंगल्याजवळ इसारवाडी फाटा येथे ही घटना घडली आहे.

कुऱ्हाडीने सपासप वार केल्यानंतरही हा आरोपी थांबला नाही. खून केल्यानंतर त्याने रस्त्यावर जल्लोष केला आणि मग तो मोटर सायकलवरून पसार झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतली आहे. बापु छब्बू खिल्लारे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपीने बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून आपल्याच भाऊजीची हत्या केल्याचं समोर येत आहे. औरंगाबाद शहरातली ही दिवसभरातली दुसरी घटना आहे, त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

काही वर्षांपूर्वी आरोपीच्या बहिणीचं लग्न झालं होतं, यानंतर तिचा घटस्फोट होऊन ती दुसरीकडे नांदत होती. याआधीही त्यांच्यात भांडणं झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!