Just another WordPress site

मालदीवमध्ये अग्नितांडव, विदेशी कामगारांच्या घरांना लागली भीषण आग, आगीत ९ भारतीयांसह १० जणांचा मृत्यू

मालदीवची राजधानी माले येथे गुरुवारी विदेशी कामगारांच्या घरांना लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये नऊ भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. मालदीवमधील भारतीय उच्चयुक्त कार्यालयाकडूनही याबाबतचे एक ट्वीट करण्यात आले असून त्यांनी मदतीसाठी फोन नंबरही दिले आहेत. दरम्यान, आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

ज्या ठिकाणी ही आग लागली ते एक अपमार्केट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. हे जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत नुकसान झालेल्या इमारतींतून १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यापैकी नऊ भारतीय तर एक बांगलादेशी नागरिक आहे. ही आग इतकी भीषण होती, की ती आटोक्यात आणण्यासाठी जवळपास चार तासांचा अवधी लागाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!