Just another WordPress site

अख्खं गाव हादरलं! कर्ज वसुलीच्या छळाला कंटाळून एकाच घरातील ६ जणांनी घेतलं विष, ५ जणांचा मृत्यू

नवादा : देशात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच आता बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिहारमधील नवादा येथील एका कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

नवादा जिल्ह्यातील आदर्श सोसायटीजवळ भाड्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील ६ जणांनी विष पित आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला असून एकावर जिल्हा सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्ज वसुलीच्या छळाला कंटाळून कुटुंबीयांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मूळचे राजौली येथील रहिवासी असलेले केदारनाथ गुप्ता नवादा येथे भाड्याच्या घरात राहत होते आणि येथे व्यवसाय करत होते. त्यांनी कोणाकडून कर्ज घेतले होते आणि त्याच कर्जाची परतफेड करण्यासाठी सततच्या दबावामुळे कुटुंबातील सदस्यांनी एकत्रितपणे विष घेतले. यामध्ये केदारनाथ गुप्ता यांच्या कुटुंबातील एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे. हे कुटुंब नवादा शहरातील नवीन भागात भाड्याच्या घरात राहत होते.

मात्र, कुटुंबातील सर्व सदस्यांनी भाड्याच्या घरात विष न घेता नवादा शहरापासून दूर असलेल्या आदर्श सिटीजवळील मजारवर जाऊन विष घेतले, असे सांगण्यात येत आहे. विष घेतल्यानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी सदर रुग्णालयात आणण्यात आले असून, एका जखमीवर नवाडा सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये घरमालक केदारनाथ गुप्ता, त्यांची पत्नी अनिता देवी, दोन मुली शबनम कुमारी- गुडिया कुमारी आणि एक मुलगा प्रिन्स कुमार यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या तपासात मृत केदारनाथ गुप्ता हा नवाडा येथे राहणाऱ्या विजय बाजार येथे फळांचे दुकान चालवत असल्याचे समोर आले. कुटुंबातील हयात असलेली मुलगी साक्षी कुमारी हिने सांगितले की, तिच्या वडिलांनी कोणाकडून कर्ज घेतले होते आणि ते कर्ज फेडण्यासाठी सतत नैराश्यात होते. तेच कर्ज फेडण्यासाठी सततच्या दबावामुळे कुटुंबीयांनी सामूहिक विष घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!