Just another WordPress site

सोशल मीडियावरचा वाद थेट पोलिस ठाण्यात; शर्लिन चोप्राने केली राखी सावंतच्या विरोधात एफआयआर दाखल

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा या दोघी सध्या चर्चेचे विषय झाल्या. कारण, दोघीही एकमेकांवर वाटेल ते आरोप करत आहेत. जेव्हा पासून साजिद खान बिग बॉस १६ च्या घरात गेला, तेव्हापासून शर्लिन चोप्राचे रक्त खवळले. तिने साजिद विरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला. तर साजिद खानच्या समर्थनार्थ राखी सावंत मैदानात उतरली होती.

 

महत्वाच्या बाबी

१. सोशल मीडियावरचा वाद थेट पोलिस ठाण्यात
२. शर्लिन आणि राखी सावंत यांच्यातील वाद वाढला
३. ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत विरोधात FIR दाखल
४. शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरुन राखीवर गुन्हा दाखल

 

साजिद खान ‘बिग बॉस’च्या घरात गेल्यानंतर त्याच्या नावावरून बाहेर बरेच वाद सुरु झाले. शर्लिन चोप्राने मीटू चळवळीदरम्यान साजिदवर गंभीर आरोप केले होते. पण आता साजिदने ‘बिग बॉस १६’मध्ये एंट्री केल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. मागच्या काही दिवसांपासून साजिद खान प्रकरणावरून शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यातील वाद वाढत चालल्याचं दिसतंय. दोघीही एकमेकींवर आरोप- प्रत्यारोप करताना दिसताहेत.

खरंतर राखी सावंत काहीना काही कारणाने चर्चेत असते. कधी हटके फॅशन, तर कधी अजबगजब वक्तव्य करून चर्चेत राहायला तिला आवडतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली. पण, यावेळी कारण वेगळे आहे. आता राखी सावंत कायदेशीर अडचणीत सापडली. राखी सावंत आणि तिची वकील फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांच्याविरोधात नुकताच एफआयआर दाखल करण्यात आला. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री शर्लिन चोप्राने राखी सावंतविरोधात एफआयआर दाखल केला असून, तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

साजिद खान-शर्लिन चोप्रा यांच्या वादात उडी घेत राखीने शर्लिनविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावेळी राखी आणि तिच्या वकील फाल्गुनी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी शर्लिनचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ मीडियाला दाखवले होते. याच विरोधात शर्लिनने तक्रार दाखल केली. अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत सांगितलं की, पत्रकार परिषदे दरम्यान राखी आणि तिच्या वकिलांनी आपला आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला आणि आपल्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली.
दरम्यान, शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंत आणि तिची वकील फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांच्याविरोधात विविध गुन्ह्यांअंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. यात पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह भाषा वापरणे, आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवणे यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तर दुसरीकडे राखी सावंतने शर्लिन चोप्रा विरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. शर्लिनने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तिने राखी सावंतवर सारखे बॉयफ्रेंड बदलण्यावरून निशाणा साधला. यामुळे राखीने शर्लिनविरोधात तक्रार नोंदवली. दरम्यान, आयपीसी कायदा ५००, ५०४, ५०९ अंतर्गत पोलिस या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!