Just another WordPress site

खळबळजनक! पत्नी बोलेना.. अन् प्रेयसीही दुर्लक्ष करत असल्याने प्रेयसीचा केला निर्घृण खून, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्याने पत्नीने बोलणे बंद केले. दरम्यान प्रेयसी देखील आपल्याला भाव देईना म्हणून एकाने प्रेयसीचा गळा चिरून, दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपास चक्र फिरवत आरोपीला अटक केली.
राम कुंडलिक सूर्यवंशी असं आरोपीचं नाव आहे. तर निकिता संभाजी कांबळे असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास खराबवाडी येथे एका शेतात झुडुपामध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. तिचा चाकूने गळा कापून खून करण्यात आला होता. याबाबत महाळुंगे चौकीत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीची ओळख पटली नसल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. पोसिसांनी परिसरातील ९० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच स्थानिक नागरिकांकडे चौकशी केली. दरम्यान पोलिसांना मिळाली की, खराबवाडी येथील एक तरुणी शनिवार रात्रीपासून बेपत्ता आहे. तिच्याबाबत माहिती काढत पोलिसांनी खून झालेल्या तरुणीची ओळख पटवली. पोलिसांनी तरुणीचे फोन कॉल चेक केले असता राम सूर्यवंशी या व्यक्तीबाबत पोलिसांना संशय आला. पोलिसांनी राम सूर्यवंशी याला पुणे येथील सिम्बायोसिस परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला राम याने निकिता ही आपली जवळची मैत्रीण असून तिला कुणी मारले, असे म्हणत दुःख व्यक्त केलं. मात्र, पोलिसी खाक्‍यासमोर त्याची बनवाबनवी फार वेळ टिकली नाही. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी करत गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांनी सांगितले की, राम आणि निकिता हे चिंचवड मधील एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. तिथे त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांनी निकिताचे आणखी कोणाशी तरी प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय रामला आला. ती त्याला भाव देत नसे. या रागातून त्याने निकिताचा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!