Just another WordPress site

खळबळजनक! चंद्रपूरमध्ये जेलमधून पॅरोलवर सुटलेल्या तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ, दोघांना अटक

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. दोन गटातील जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून शीर धडावेगळे करण्यात आले. या घटनेमुळे चंद्रपूरमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर निवासी परिसरात ही घटना घडली. महेश मेश्राम असं मृत तरुणाचे नाव असून त्याच्यावर ३ ते ४ जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केला. काल रात्री साडे दहाच्या सुमारास महेश दुर्गापुरातील एका बारमध्ये बसला होता. यावेळी त्याच्याशी आरोपींचे भांडण झाले होते. आरोपींनी त्याला बाजूच्या पेट्रोल पंप परिसरात नेत बेदम मारहाण केली. दगडाने त्याला मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर धारधार शस्त्रांनी त्याचे शीर कापून धडावेगळे करण्यात आले. जवळपास ५० मीटर आरोपीचे मुंडके नेण्यात आले. यादरम्यान या मुंडक्यासोबत आरोपी फुटबॉलसारखे खेळत असल्याचे काहींनी बघितले. इतकी थरारक ही घटना होती. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली असण्याची दाट शक्यता आहे.
मृतक महेश मेश्राम याची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. आरोपी आणि मृतकाचा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी संशयाच्या आधारे सध्या २ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!