Just another WordPress site

निवृत्तीवेतनधारकांना दिलासा, हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत, अन्यथा पेन्शन थांबणार!

पुणे : निवृत्तिवेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन कोशागार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

निवृत्तीवेतनधारकांना बँकेमध्ये प्रत्यक्ष हजर राहून हयातीच्या दाखल्यावर बँक व्यवस्थापकासमोर स्वाक्षरी करता येईल. राज्य सरकारच्या कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याने सही व शिक्क्यासह साक्षांकित केलेला हयातीचा दाखला कोशागारात सादर करावा.

हयातीचा दाखला https://jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन सादर करता येईल. जीवनप्रमाण पोर्टलवर हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची कार्यपद्धती https://youtube/nNMIkTYqTF8 लिंक वर उपलब्ध आहे. यादृष्टीने बायोमेट्रिक ठसे घेण्यासाठी बायोमेट्रिक डिव्हाइसची माहिती https://uidai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून डिजिटल हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची सशुल्क सुविधा आहे. ही सेवा वापराची विनंती टपाल विभागाकडे स्वतःच्या मोबाइलद्वारे करण्यासाठी ‘पोस्टइन्फो ॲप’ गुगल प्लेस्टोअर ॲपवरुन डाऊनलोड करावे. ज्यांना मोबाईल वापरता येत नाही, त्यांनी नजीकच्या टपाल कार्यालयास भेट द्यावी.

निवृत्तीवेतनधारकांनी टपाल विभागास कळविल्यानंतर टपालवाहक आवश्यक साहित्यासह त्यांच्या निवासस्थानी येऊन बोटांचे ठसे घेणार आहेत. सुविधा सशुल्क असल्याची नोंद घ्यावी. टपालवाहकामार्फत ऑनलाइन डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्याची सविस्तर माहिती http://youtube/cERwMU7g54 या लिंकवर उपलब्ध आहे.विदेशात वास्तव्य करणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना भारतीय दूतावास, भारतीय उच्च आयुक्तालय येथील प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत हयातीचा दाखला सादर करता येईल, अशी माहिती जिल्हा कोशागार अधिकारी यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!