Just another WordPress site

तुम्हाला ठाऊक आहे का, रेस्टॉरंटमध्ये खाल्यानंतर ग्राहक वेटरला ‘टीप’ का देतात? कधी सुरु झाली टीप देण्याची पद्धत?

आपण एखाद्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलात काही खाण्यासाठी गेलो की आपलं जेवण झाल्यानंतर वेटर बिल आणून देतो. बिल चुकतं केल्यानंतर वेटरला काही पैसे टीप म्हणून दिले जातात. तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का, की आपण असं का करतो? मुळातच टीप देण्याची पद्धत कशी सुरू झाली? त्यामागची कहाणी काय आहे? चला याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. १७०६ साली ‘टीप’ हा शब्द प्रथम वापरला गेला
२. टीप देण्याच्या पद्धत १६ व्या शतकात झाली सुरु
३. अमेरिकेत टीप देण्याची सुरुवात १८ व्या शतकात
४. टीप जबरदस्ती देण्यासाठी भाग पाडले जात नाही

 

ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार १७०६ साली ‘टीप’ हा शब्द प्रथम वापरला गेला. रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर आपल्याला सेवा देणाऱ्या वेटरला टीप देण्याची पद्धत इंग्रजांनी सुरू केली. १६०० साली या पद्धतीला सुरुवात झाली असं सांगितलं जातं आणि याच काळात इंग्रजांनी भारतात पाऊल टाकलं होतं. १६०० मध्ये, ब्रिटीश हवेलीमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांना चांगली सेवा दिल्यामुळे थोड्या प्रमाणात रक्कम देण्यास सुरुवात केली गेली. त्याची सुरुवात कर्मचार्‍यांच्या कौतुकासाठी केली गेली. नंतर तो एक ट्रेंड बनला.

पण अमेरिकेत मात्र यामागची वेगळीच गोष्ट आहे. फूटवूल्फ या वेबसाइटच्या माहितीनुसार अमेरिकेत टीप देण्याची सुरुवात १८ व्या शतकात झाली असं सांगतात. न्यूयॉर्कच्या कॉर्नेल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशनमधील प्राध्यापक मायकल लिन यांच्या माहितीनुसार, अमेरिकेत टीप देण्याच्या पद्धतीची सुरुवात उच्च वर्ग म्हणजेच श्रीमंत वर्ग हा आपली श्रीमंती दाखविण्याच्या उद्देशातून टीप देऊ लागला. समाजातील हा श्रीमंत वर्ग यातून आपल्या आर्थिक प्रबळतेचं दर्शन घडवायचा.
मात्र, लिन यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, याची सुरुवात फक्त १७ व्या शतकात ब्रिटनमध्ये झाली होती. जेव्हा विशेषत: मद्यपान करणारे लोकं वेटर किंवा नोकरांना टीप देत असत. कारण ते मद्यपान करणाऱ्या लोकंना दारु ओतून देतात किंवा त्यांचे ग्लास सांभाळत असतं.

विशेष म्हणजे, टीप देण्याची पद्धत बंद करण्यासाठीही प्रयत्न केले गेले होते. १७६४ साली जेव्हा संपूर्ण ब्रिटनमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट आणि पब कर्मचाऱ्यांना भत्ता देण्यास सुरुवात करण्यात आली तेव्हा कर्मचाऱ्यांना टीप देण्याची पद्धत संपुष्टात आणण्यासाठीचे प्रयत्न झाले होते. यावरुन लंडनमध्ये खूप मोठा वादही उफाळून आला होता. तर जॉर्जियामध्ये त्यावेळी एक अँटी-टिपिंग सोसायटी ऑफ अमेरिकेची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर वॉशिंग्टनसहीत ६ अमेरिकी राज्यांनी टीपिंग विरोधी कायदा संमत केला होता. दरम्यान १९२६ साली अमेरिकी राज्यांनी टिपिंग विरोधी कायदा रद्द देखील केला.

तसे पहाता टीप देणे आपल्यावर अवलंबून असते. तुम्हाला ही टीप जबरदस्ती देण्यासाठी कोणीही भाग पाडू शकत नाहीत.
ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ नुसार जर एखाद्या ग्राहकास सेवा शुल्क म्हणून चुकीच्या मार्गाने पैसे भरण्यास भाग पाडले गेले असेल, तर तो कंज्यूमर फोरममध्ये तक्रार करू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!