Just another WordPress site

सर्वसामान्य जनतेला धक्का! घरगुती गॅस वापराचा कोटा निश्चित, वर्षभरात फक्त १५ सिलिंडरच मिळणार

नवी दिल्ली : महागाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता आणखी एक धक्का बसणार आहे. घरगुती LPG गॅस सिलिंडर धारकांना आता रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. नवीन नियमांनुसार ग्राहकांना आता एका वर्षात फक्त १५ सिलिंडर मिळणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना १५ पेक्षा जादा सिलिंडर मिळणार नसल्याने सर्वसामान्य जनतेला हा आणखी एक धक्का बसला आहे.
वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून विभागाला अशा तक्रारी येत होत्या की, घरगुती विनाअनुदानित रिफिल व्यावसायिकांपेक्षा स्वस्त असल्याने तेथे वापरल्या जात आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार हे बदल तिन्ही तेल कंपन्यांच्या ग्राहकांना लागू पडणार आहेत. अनुदानित घरगुती गॅससाठी नोंदणी केलेल्यांना या दराने वर्षभरात फक्त १२ सिलिंडर मिळतील. तसेच यापेक्षा जास्त गरज असल्यास अनुदान नसलेले सिलिंडरच घ्यावे लागतील.

संख्या १५ पेक्षा जास्त नाही

रेशनिंग अंतर्गत एका कनेक्शनवर महिन्यात फक्त दोनच सिलिंडर मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत ही संख्या एका वर्षात १५ पेक्षा जास्त असू शकत नाही. जर एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त किंमत मोजावी लागत असेल, तर त्याचा पुरावा देताना त्याला तेल कंपनीच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. तरच तुम्हाला अतिरिक्त रिफिल मिळू शकेल.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!