Just another WordPress site

तुम्हाला माहितेय का, ऑस्करवारीसाठी भारतीय चित्रपटांची निवड नेमकी कशी होते?

हॉलिवूडचा सर्वोच्च पुरस्कार सोहळा मानला जाणाऱ्या ‘ऑस्कर’साठी भारताकडून यंदा गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली. छेल्लो शो असं या गुजराती चित्रपटाचं नाव आहे. अनेक चित्रपट या ऑस्करवारीच्या शर्यतीत असताना ‘छेल्लो शो’नं बाजी मारली. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया च्या निवड समितीनं ऑस्करसाठी छेल्लो शो अधिकृत निवड झाल्याचं जाहीर केलं. दरम्यान, ही निवड नेमकी कशी केली जाते? याच विषयी जाणून घ्या.
सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. अँड द ऑस्कर गोज टू… हे पुरस्कार सोहळ्यातील शब्द ऐकण्यासाठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सगळ्यांचेच कान आसुसलेले असतात. हा पुरस्कार आपल्याला मिळावा यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. गेल्या काही वर्षांपासून भारतीय चित्रपट देखील जगभरातील अभ्यासक आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत. त्यामुळे दरवर्षी भारतीय एक चित्रपट ऑस्करसाठी पाठवले जातोय. यंद ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटानं ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळवली.

 

‘छेल्लो शो’चे दिग्दर्शन कोणी केलं?

छेल्लो शो या गुजराती चित्रपटामध्ये गावातल्या एका मुलाची गोष्ट आहे. ज्याचं चित्रपटांवर प्रेम आहे. हा मुलगा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमा प्रोजेक्टर टेक्निशियनच्या मदतीने गुजरातमधील ‘छलाला’ इथल्या प्रोजेक्शन रुममध्ये पोहोचतो. अनेक चित्रपट पाहतो. ते पाहताना त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून जातं. ‘सिंगल स्क्रिन’ चित्रपटाचं जग ‘छेल्लो शो’मध्ये दाखवलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शक पान नलिन यांनी केलं. त्यांचं आयुष्यही या चित्रपटाशी मिळतं-जुळतं असल्याचं बोललं जातं. त्यामुळं चित्रपटाची कथा पान नलिन यांची ‘सेमी ऑटोबायोग्राफी’ असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 

 

कशी असते निवड प्रक्रिया?

दरवर्षी भारतात बनलेल्या असंख्य चित्रपटांमधून ऑस्कर पुरस्कारांसाठी एक चित्रपट पाठवला जातो. या चित्रपटाच्या निवड प्रक्रियेचा भारत सरकारशी काहीही संबंध नसतो. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियातर्फे या कामावर देखरेख ठेवली जाते. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ही देशभरात कार्यरत असलेल्या फिल्म युनियनची मातृसंस्था मानली जाते. यात दरवर्षी ऑस्करसाठी चित्रपट पाठवण्यासाठी ज्युरी निवड केली जाते. दरवर्षी सप्टेंबर महिन्यापासून ऑस्करला चित्रपट पाठवण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु होते. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाभारतातील सर्व चित्रपट संघटनांना आमंत्रणं पाठवते. त्या आमंत्रणावर अनेक निर्माते त्यांचे त्यांचे चित्रपट यासाठी सादर करतात. यानंतर फिल्म असोसिएशनतर्फे असलेले ज्युरी हे सर्व चित्रपट पाहतात. यानंतर सप्टेंबरच्या अखेरीस, ऑस्करसाठी जाणाऱ्या चित्रपटांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली जाते.

ज्युरीमध्ये कोण असतं?

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियासाठी काही ठराविक ज्युरी सदस्यांची निवड केली जाते. यात बहुतांश सदस्य हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सदस्य असतात. यात प्रतिष्ठित निर्माते, दिग्दर्शक, लेखक, कलाकार, कॅमेरामन, संगीतकार, गीतकार, संपादक, मेकअप मेन, हेअर स्टायलिस्ट, ध्वनी, व्हिज्युअल इफेक्ट्स यांसारखे चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असणारे प्रत्येक शैलीतील लोक असतात. ज्युरीसाठी विविध चित्रपट संघटनांचे प्रतिनिधी किंवा स्थायी समितीचे सदस्य सहभागी होऊ शकत नाही. तसेच एकदा ज्युरीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीला पुन्हा त्यात सहभागी होता येत नाही.

 

ऑस्कर पुरस्कार कसा मिळतो?

वर्षभरातील सर्वात गाजलेल्या सिनेमांपैकी नऊ सिनेमे अंतिम फेरीत जातात. या नऊ सिनेमांपैकी टॉप पाच सिनेमांनाच नामांकन मिळतं. या पाच सिनेमांपैकी एका सिनेमाला ऑस्कर पुरस्कार मिळतो. सिनेमाच्या निवडीसाठी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसची एक रिसर्च टीम आहे. यात अभिनेत्यांपासून दिग्दर्शक, छायांकन, सिनेमॅटोग्राफर, हेअर स्टायलिस्ट, निर्माते यांसारखे अनेक लोक येतात. ही टीम नामांकन केलेल्या सिनेमांना सर्व स्तरावर योग्य आहे की नाही ते पाहते. सिनेमाच्या निर्मात्यांना या टीमसाठी स्क्रीनिंग ठेवावं लागतं. एवढंच नाही तर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे प्रमोटही करावं लागतं. ज्या सिनेमा नामांकन मिळतं त्यासाठी मतदान केलं जातं. ज्याला सर्वाधिक मतं मिळतात तो सिनेमा विजयी ठरतो.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!