Just another WordPress site

“अवघ्या १५ वर्षीय मुलाने मला किळसवाण्या पद्धतीने स्पर्श…” सुष्मिता सेनने सांगितला ‘तो’ प्रसंग

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा आज ४७ वा वाढदिवस आहे. सुष्मिताने दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिच्या सौंदर्यानेही अनेकांना भुरळ पाडली. ‘दस्तक’, ‘सिर्फ तुम’, ‘चिंगारी’, ‘मैं हू ना’, ‘वास्तू शास्त्र’ अशा एक सो एक हिट चित्रपटातून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयाने चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या आणि ‘मिस युनिव्हर्स’चा किताब नावावर करणाऱ्या सुष्मितालाही विनयभंगासारख्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं.

 

महत्वाच्या बाबी

१. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा आज वाढदिवस
२. दमदार अभिनयाने सुष्मिताचे प्रेक्षकांच्या मनात स्थान
३. सुष्मिता सेन एक प्रेमळ आई म्हणून कायम चर्चेत
४. सुष्मिता सेनलाही विनयभंगाला सामोरं जावं लागलं

 

खरंतर सुष्मिता केवळ अभिनयच नव्हे तर, तिच्या प्रेमळ वागणुकीमुळे देखील बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. दोन मुलींना दत्तक घेऊन, त्यांना पोटच्या मुलींप्रमाणे प्रेम देणारी सुष्मिता एक प्रेमळ आई म्हणून देखील चर्चेत असते. मात्र, एका कार्यक्रमादरम्यान अवघ्या १५ वर्षांच्या लहान मुलाने सुष्मिताला किळसवाणा स्पर्श केला होता. अनेकदा गर्दीच्या ठिकाणी कलाकारांना विचित्र पद्धतीने हात लावण्याचे, स्पर्श करण्याचे प्रसंग घडत असतात. एका कार्यक्रमात सुष्मितासोबत देखील एक अशीच घटना घडली होती. ही घटना तिने एका मुलाखतीत बोलताना सांगितली होती.

या मुलाखतीत सुष्मिताला “तुझ्याबरोबरही विनयभंग किंवा छळ करण्याचा प्रयत्न झाला आहे का?”, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना सुष्मिताने काही वर्षांपूर्वी तिच्याबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, “एका मुलाने मला विचित्र पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे खूप माणसं होती, त्यामुळे हे कोण करत आहे हे मला समजणार नाही, असं त्याला वाटत होतं. मी त्याचा हात पकडला आणि त्याला ओढलं.

त्याला बघताच मला धक्काच बसला. कारण तो फक्त १५ वर्षाचा मुलगा होता. मी त्याची मान पकडली आणि त्याला बाजूला घेऊन गेले. त्यावेळी मी त्याच्यावर कडक कारवाई करू शकले असते पण,ने या मुलाविरोधात कोणतीही कारवाई केली नाही”.
तर सुष्मिता त्या मुलाला बाजूला घेऊन गेली आणि त्याला प्रश्न विचारला की, मी ही सगळी घटना सर्वांसमोर सांगितली, तर तुझं काय होईल? यावर त्या मुलाने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली.

आपण असं काही केलंच नाही, असे तो म्हणू लागला. पण, सुष्मिता त्याला म्हणाली की, तू जे केलंयस ते मला माहित आहे. तू तुझा गुन्हा कबूल केलास तर ते तुझ्यासाठी चांगलं असेल. सुष्मिताच्या समजवण्यानंतर त्या मुलाने आपलं कृत्य कबूल केलं आणि तिची माफी देखील मागितली. सुष्मिताने त्या मुलाला, या गोष्टी कशा चुकीच्या आहेत आणि त्याचा आयुष्यावर कसा परिणाम होऊ शकतो, याची समज दिली. त्यानंतर त्या मुलाने कुठल्याही मुलीचा विनयभंग करणार नाही, अशी सुश्मिताला खात्री पटवून दिली.

पुढे सुष्मिता म्हणाली, “हाच फरक आहे. त्या १५ वर्षीय मुलाला हे सगळं मजा म्हणून केलं जातं, असं वाटत होतं. या गोष्टी किती गंभीर आहेत, हे त्याला कोणीही शिकवलं किंवा सांगितलं नव्हतं, हे मला जाणवलं. ही खूप मोठी चूक आहे”.
दरम्यान, सुष्मिता ‘ताली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी व्यावसायिक ललित मोदी यांच्याबरोबरच्या रिलेशनशिपमुळे सुष्मिता चर्चेत आली होती. सुष्मिताने अद्याप लग्न केलं नसून तिने रेनी आणि अलिशा या दोन मुलींना दत्तक घेतलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!