Just another WordPress site

मोठी बातमी! एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा; काय प्रकरण आहे?

 

Pradeep Sharma: मुंबई पोलीस दलाचे माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2006 च्या लखनभैया बनावट  एन्काउंटप्रकरणी शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ही (Bombay High Court) शिक्षा सुनावली आहे.

2006 च्या लखनभैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी आपला निकाल जाहीर केला. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 2006 मध्ये दाखल केलेल्या 16 अपीलांवर सुनावणी करत 8 नोव्हेंबर 2023 रोजी निकाल राखून ठेवला.

काय प्रकरण आहे?

लखनभैय्याचे खरे नाव रामनारायण गुप्ता असून त्याच्यावर गँगस्टर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर 2006 रोजी त्याला मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वर्सोवा सेव्हन बंगल्यातील नाना नानी उद्यानाजवळ लखनभैय्याला पोलीसांच्या  पोलीस चकमकीत ठार करण्यात आले. या चकमकीचे नेतृत्व एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी केले.

2006 मध्ये झालेल्या चकमकीची एसआयटीने चौकशी केली असता, ही चकमक बनावट असल्याचे समोर आले. यानंतर लखनभैया एन्काउंटर प्रकरणात प्रदीप शर्मा आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांसह १३ पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. 2008 मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते. प्रदीप शर्मा हे 1983 च्या बॅचचे अधिकारी होते. ते 2020 मध्ये निवृत्त होणार होते, परंतु त्यापूर्वी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि राजकारणात नशीब आजमावले. मात्र राजकारणात ते अपयशी ठरले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!