Just another WordPress site

हातपाय बांधून तरुणीवर लैंगिंक अत्याचार केला, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, शिर्डीतील धक्कादायक घटना

अहमदनगर : शहरातील एका सामाजीक संस्थेतून निघून गेलेल्या २१ वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शिर्डी येथे घडली. तिची प्रकृती ठिक नसल्याने तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याचे समोर आले. या पीडित तरुणीच्या जबाबावरून पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. सुमारे चार वर्षांपूर्वी या तरुणीला अल्पवयीन असताना एका संस्थेत दाखल करण्यात आले होते. तिला ट्रेनिंग दिल्यानंतर तिला नोकरी मिळाली होती. नोकरी करत असलेल्या ठिकाणाहून ती निघून गेली होती, असे सांगण्यात आले.

एका संस्थेतून निघून गेलेली तरुणी शिर्डी मंदिर परिसरात एकटीच राहत होती. दिवाळीच्या आगोदर रात्रीच्या वेळी शिर्डी येथील अनोळखी पाच मुलांनी तिला जेवण देतो, असे सांगून त्यांच्या मंदीर परिसरातील एका रूमवर नेले. त्यानंतर हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला आणि पाचही संशयितांनी तिच्यावर अत्याचार केला. या तरुणीच्या जबाबावरून एमआयडीसी पोलिसांत ५ अनोळखी आरोपींविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक दीपक पाठक पुढील तपास करीत आहेत.

चार वर्षे संस्थेत; नंतर संपर्क तुटला

४ वर्षांपूर्वी शिर्डी येथून पोलिसांनी सुटका करून या तरुणीला नगर येथे एका अनाथ मुलामुलींचा सांभाळणाऱ्या संस्थेत दाखल केले होते. तिला आधार देऊन ट्रेनिंग दिली. ती सज्ञान झाल्यानंतर तिला नोकरी मिळाल्याने ती तिकडे गेली. त्यानंतर तिचा संस्थेशी संपर्क तुटला. ती काम करत असलेल्या ठिकाणाहूनही निघून गेली. त्यानंतर ती शिर्डीत एकटीच राहत होती. पोलिसांनी संस्थेशी संपर्क साधल्यावर ती शिर्डीत असल्याचे कळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!