Just another WordPress site

३६० कोटींची मालकीन असलेली बॉलिवूड अभिनेत्री कतरिना एका सिनेमासाठी घेते ‘एवढं’ मानधन

मुंबई : हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या कतरिना कैफने २००३ मध्ये बूम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर आपल्या मेहनतीच्या जोरावर कतरिना आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींनपैकी एक बनली आहे. कतरिनाने अभिनेता विकी कौशलशी लग्न केल्यानंतर तिच्या लाईफ स्टाईल आणि प्रॉपर्टी बद्दल बरीच चर्चा सुरु झाली होती. आजपर्यंत कतरिनाने अनेक सुपर हिट चित्रपटांमध्ये काम केलं आणि सध्या ती करोडोंची मालकीण देखील आहे.

कतरिना कैफने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत एकूण ४० हून अधिक चित्रपट केले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना एका चित्रपटासाठी ९ ते १० कोटी रुपये मानधन घेत असल्याचे एका मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिनाची एकूण संपत्ती २३० कोटी ते ३०६ कोटी इतकी आहे. या कमाईमध्ये चित्रपट आणि जाहिरातीं समाविष्ट आहेत. याशिवाय अभिनेत्रीने Kay By Katrina नावाचा स्वतःचा मेकअप ब्रँड देखील सुरू केला आहे, ज्यातून ती चांगला व्यवसाय करते त्यामुळे तिचे उत्पन्न देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये तिने एकदा सांगितले होते की ती प्रॉपर्टीमध्ये जास्त गुंतवणूक करत नाही. प्रॉपर्टीबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफ ६ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ४५ कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची मालक आहे.

लग्नापूर्वी कतरिना कैफ मुंबईत भाड्याच्या घरात राहायची पण तिचा लंडनमध्ये ७ कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे. कतरिना कैफ लक्जरी कारची शौकीन आहे. तिच्याकडे २.५ कोटी किमतीची लँड रोव्हर, रेंज रोव्हर वोग एलडब्ल्यूबी, ४० लाखांची ऑडी क्यू ३, ८० लाख रुपयांची ऑडी क्यू ७ आणि सुमारे ७० लाख रुपयांची मर्सिडीज एमएल ३५० सारख्या गाड्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!