Just another WordPress site

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची निवड; कोण आहेत अमोल काळे, त्यांच फडणवीसांशी कनेक्शन तरी काय?

सध्याच्या घडीला अमोल काळे हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ते लढवत होते. पण त्यांनी या लढतीत भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यावर मात करत ही निवडणूक जिंकली आहे. यानंतर अमोल आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाते आता समोर आले आहे.

अमोल हे नागपूर महापालिकेत विद्युत कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्रात २०१४ साली महाराष्ट्रात युतीचे सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. त्यावेळ अमोल हे सर्वप्रथम चर्चेत आले. त्या काळात अमोल काळे यांच्या ‘जे. के. सोल्युशन्स’ या कंपनीला शहरातील पथदिव्यांना एलईडी लाइट्‌समध्ये परावर्तित करण्याचे कंत्राट मिळाले होते. या पथदिव्यांमुळे महापालिकेची मोठी आर्थिक बचत होईल, असा दावा करण्यात आला होता. अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्याने काळे यांना ते कंत्राट मध्येच सोडावे लागले होते. शहरातील अभ्यंकरनगर येथील रहिवासी असलेले काळे हे रिअल इस्टेट, आरोग्य, लॉजिस्टिक्स, मीडिया व्यवस्थापन, संरक्षण, ऊर्जा क्षेत्रातही कार्यरत आहेत. ‘जे. के. सोल्युशन्स’सोबतच ते ‘अर्पित एन्टरप्रायझेस’ या कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

एलईडी पथदिव्यांच्या कंत्राटानंतर चर्चेत आलेले काळे हे थेट मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष झाले. अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. काही महिन्यांपूर्वी महाआयटी विभागातील कथित घोटाळ्याप्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काळेंवर आरोप केले होते. फडणवीस यांचे घनिष्ठ मित्र असतानाही काळे कायम पडद्यामागे राहणे पसंत करतात. एका धनाढ्य संस्थेची धुरा येण्याची दाट शक्यता असल्याने सध्या या नागपूरकराने सामान्यांचा ‘गुगल सर्च’ वाढविला आहे.

पण मी फडणवीस यांचा मित्र असलो तरी मी कर्तुत्वाने या पदासाठी उभा राहीलो आहे, हे अमोल यांनी यापूर्वी सांगितले आहे. कारण यापूर्वी त्यांनी एमसीएचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे त्यांना एमसीएच्या कामाचा चांगला अनुभव आहे आणि या कामाच्या अनुभवाच्या जोरावर ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!