Just another WordPress site

ब्ल्यू टिक असो वा नसो, तुम्हाला ट्विटर वापरण्यासाठी पैसे भरावे लागणार?

न्यूयॉर्क : ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासूनच एकापाठोपाठ एक घोषणांचा धडाकाच लावला आहे. आता पुन्हा एकदा कंपनीकडून नवीन घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान, तुम्हाला ट्विटर अकाउंट वापरण्यासाठी प्रतिमाह काही रक्कम भरावी लागणार आहे. मग तुम्हाला ब्ल्यू टिक असो वा नसो, तुम्हाला ट्विटर वापरण्यासाठी पैसे भरावे लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर काही दिवसांतच ट्विटरवर व्हेरिफाइड असणाऱ्या अकाउंट्सबाबत एक महत्त्वाची घोषणा केली. ट्विटरवर ब्ल्यू टिक असेल तर ते अकाउंट वापरण्यासाठी तुम्हाला प्रतिमाह 650 रुपये ट्विटरला द्यावे लागणार होते. पण आता व्हेरिफाइड अकाउंट नसेल तरी ते वापरण्यासाठी युजर्सना पैसे भरावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तुम्ही Twitter वापरकर्ता असाल आणि तुमच्याकडे ब्लू टिक नसेल, तरीही तुम्हाला शुल्क भरावं लागणार आहे.

ट्विटर वापरण्यासाठी काही पैसे मोजावे लागणार असल्याच्या चर्चा होत आहेत. पण अद्याप ट्विटरकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलॉन मस्क यांनी अलीकडेच कंपनीच्या कर्मचार्‍यांसह एक बैठक घेतली. ज्यामध्ये सध्याच्या ट्विटर युजर्सना एका महिन्याचा मर्यादित वेळ दिला जाईल, त्यानंतर कंपनीकडून युजर्सना मंथली प्लान ऑफर केला जाईल. हा प्लान घेतल्यानंतरच यूजर्स पुन्हा ट्विटर अकाउंट वापरु शकतील.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!