Just another WordPress site

ब्लडी रिव्हर : पेरूमध्ये वाहतेय रक्ताची नदी, व्हिडिओ व्हायरल

आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांच्याबद्दल आपल्याला फारचं माहित नसतं किंवा आपण त्याबद्दल जाणून घेण्याचा फारचा प्रयत्न करत नाही. परंतू आपल्याकडे भारतात अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आज आम्ही अशा नदीबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला विचित्र वाटेल.

भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या रंगाची नदी असल्याचे तुम्ही पाहिले असेल. त्यामध्ये हिरवी, नीळी, सफेद अशी नदी दिसते. पण एक अशी नदी. जी लाल रंगाची दिसते. ज्यामुळे तिला रक्ताची नदी किंवा ‘ब्लडी रिव्हर’ देखील म्हणतात.

तुम्हाला विश्वास बसत नसेल, तर हा व्हिडीओ पाहा. या ब्लडी रिव्हरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटले आहे. तर काही युजर्सना हा काय प्रकार आहे? असा प्रश्न पडला आहे.

येथे लाल रंगाची नदी वाहते

पेरूमध्ये वाहणारी लाल रंगाची नदी क्लिप व्हायरल होत असल्याचे दिसत आहे आणि यामुळे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ जुना आहे, परंतू तो आता पुन्हा व्हायरल होत आहे.

यावेळी हा व्हिडीओ ट्विटर युजर फॅसिनेटिंगने शेअर केला असून त्यात दक्षिण अमेरिका खंडातील एका खोऱ्यातून नदी वाहताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये पाहिल्याप्रमाणे, कुस्कोमधील या नदीला चेरी किंवा विटांसारखे लाल पाणी वाहात असताना दिसत आहे. याला स्थानिक भाषेत पुकामायु म्हणून ओळखले जाते. क्वेचुआ भाषेत ‘पुका’ म्हणजे लाल आणि ‘मायु’ म्हणजे नदी.

स्थानिक लोकांच्या मते, मातीच्या विविध थरांमध्ये असलेल्या खनिज घटकांमुळे नदीचे पाणी लाल आहे. हा रंग लोह ऑक्साईडच्या उपस्थितीमुळे आहे, विशेषतः पर्वतांच्या लाल क्षेत्रापासून. पावसाळ्यात नदीत पाणी वाहत असताना असे दृश्य पाहायला मिळते.

लाल नदी फक्त पावसाळ्यातच दिसते. उर्वरित वर्षात पाण्याचा प्रवाह संथ असतो आणि ‘नदीचा’ रंगही एक प्रकारचा गढूळ तपकिर रंगाचा राहतो. या नदीचे उगमस्थान पालकोयो इंद्रधनुष्य पर्वत आहे.

लोकांनी या व्हिडीओला खूप लाईक आणि शेअर केलं आहे. तसेच यावर अनेकांच्या कमेंट्स देखील आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!