Just another WordPress site

‘व्हॅक्युम क्लिनर’ नाटक पाहिल्यानंतर राज ठाकरेंनी केलं अशोक सराफ यांचे तोंडभरून कौतूक, “पंचाहत्तरीत अशोक सराफांची ऊर्जा थक्क करणारी”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कलाक्षेत्रावर असणारे प्रेम सर्वश्रुत आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या गाठीभेटीही ते नेहमी घेत असतात. अलीकडेच ‘हर हर महादेव’ या सिनेमासाठी त्यांनी दिलेल्या व्हॉइस ओव्हरचीही विशेष चर्चा झाली. दरम्यान मनोरंजन विश्व आणि मराठी कलाकार यांच्यावर असणाऱ्या राज ठाकरे यांच्या प्रेमाची प्रचिती पुन्हा एकदा आली. निमित्त होतं ‘व्हॅक्युम क्लिनर’ या अभिनेते अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांच्या नाटकाचं.

 

महत्वाच्या बाबी

१. पंचाहत्तरीत अशोक सराफांची ऊर्जा थक्क करणारी
२. राज ठाकरेंनी केले अभिनेते अशोक सराफांचे कौतूक
३. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केलंय
४. ‘व्हॅक्युम क्लिनर’चे आतापर्यंत ३०० हून अधिक प्रयोग

 

राज ठाकरे कायमच चांगल्या कलाकृतींचे तोंडभरुन कौतूक करत असतात. नुकतंच त्यांनी रंगभूमीवर गाजत असलेलं व्हॅक्यूम क्लिनर हे नाटक पाहिलं आणि या नाटकातील कलाकारांवर कौतूकाचा वर्षाव केला. मराठीतील विनोदाचे बादशाह अशोक सराफ यांची या नाटकात महत्त्वाची भूमिका असून त्यांच्यासह अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी यात महत्त्वाची भूमिका वठवली. ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक पाहिल्यानंतर या नाटकावर राज ठाकरे प्रतिक्रिया देण्यापासून स्वत:ला थांबवूच शकले नाही. यानिमित्त त्यांनी नाटकातील कलाकारांची भेट घेतली आणि त्यांच्यासाठी खास पोस्टही शेअर केली. विशेषत: ते अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांच्याविषयी भरभरुन बोलले.
या नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मिडियावर एक विशेष पोस्ट शेअर केली.

राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन अशोक सराफ, निर्मिती सावंत आणि नाटकातील कलाकारांबरोबरचे फोटो शेअर केले. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, “नुकतंच मी अशोक सराफ आणि निर्मिती सावंत ह्यांचं ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक पाहिलं. व्हॅक्युम क्लिनरच्या ‘धक्क्याने’ नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आली”, असं म्हटलंय.
पुढे त्यांनी “पण वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून थक्क व्हायला झालं. निर्मिती सावंत यांचा बहारदार अभिनय आणि संचातील इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय मस्त होता. ह्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-कलाकार, तंत्रज्ञ ह्या सगळ्यांचंच मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छादेखील”, असं म्हणत नाटकातील सर्वच कलाकारांचं कौतुक केलं आहे.

राज ठाकरेंनी निर्मिती सावंत यांच्याविषयी लिहिलं आहे की, ‘निर्मिती सावंत यांचा बहारदार अभिनय आणि संचातील इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय मस्त होता. ह्या नाटकाच्या लेखक-दिग्दर्शक-कलाकार, तंत्रज्ञ ह्या सगळ्यांचंच मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देखील.’

‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकांत अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांच्यासह तन्वी पालव, रेणुका बोधनकर, प्रथमेश चेऊलकर, सागर खेडेकर या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरने केलंय. कोरोनाचा काळ वगळता गेली ४ वर्षे ‘व्हॅक्यूम क्लीनर’ हे नाटक रंगभूमीवर जोरात सुरु असून त्याचे आतापर्यंत ३०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!