Just another WordPress site

मोठी बातमी : सानिया मिर्झा आणि क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्पोट होणार, कायदेशीर प्रक्रिया सुरू

भारताच्या स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक यांच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र घटस्फोटाच्या या बातम्यांवर दोघांच्या जवळच्या मित्राने शिक्कामोर्तब केले आहे. दोघांनी आता औपचारिकरित्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.

मिडीया वृत्तानुसार, सानिया आणि शोएब यांच्या जवळच्या मित्राकडून बातमी समोर आली आहे की दोघेही विभक्त होणार आहेत. दोघांमध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय झालेला आहे. सध्या शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे. तो एका स्पोर्ट्स चॅनलमध्ये टी20 वर्ल्ड कपवर काम करत आहे. बोललं जात आहे की, सानिया मिर्झा दुबईमध्ये आहे. सानियाने नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे चर्चांना आणखी वाव मिळाला होता. शुक्रवारी सानियाने आपला मुलगा इजहानसोबत एक गोड फोटो शेअर केला होता आणि त्यात ते क्षण तुला सर्वात कठिण दिवसांमध्ये घेऊन जातात.

तर, एका मीडिया वृत्तानुसार, शोएब मलिकच्या पाकिस्तानातील व्यवस्थापन संघाच्या एका सदस्याने सांगितले की, दोघांचा घटस्फोट झाला आहे. त्या दोघांनी आता औपचारिकरित्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.. दोघं आता विभक्त राहत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!