Just another WordPress site

पोटचा मुलगा नाही तर लालू प्रसाद यादव यांना ‘ही’ व्यक्ती करणार किडनी दान

नवी दिल्ली : राजद प्रमुख बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे सध्या किडनीच्या समस्येने त्रस्त आहेत. सध्या ते दिल्लीत असून लवकरच किडनी प्रत्यारोपणासाठी पुन्हा सिंगापूरला जाणार आहेत. लालू प्रसाद यादव यांची किडनी याच महिन्यात प्रत्यारोपण होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान ते किडणी प्रत्यारोपणासाठी तयार नव्हते परंतु त्यांच्या मुलगीच्या विनंतीवर त्यांनी किडणी प्रत्यारोपण करण्याचे ठरवले आहे. त्यांची मुलगी रोहिणी आपली किडनी लालू प्रसाद यांना देणार आहे. यामुळे मुलगी वडिलांच्या आजारपणाला धावून आल्याने लालुंच्या मुलगीची जोरदार चर्चा रंगली आहे.

मागच्या कित्येक महिन्यांपासून लालूप्रसाद यादव किडणीच्या आजाराने त्रस्त आहेत. ते दिल्लीती एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान ते किडनीच्या समस्येच्या उपचारासाठी सिंगापूरच्या प्रसिद्ध रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर सिंगापूरहून चेकअप करून परत आले.

या दरम्यान त्यांची किडणी बदलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यावेळी लालू प्रसाद यांची मुलगी रोहिणी लालूंसोबत होती. यावेळी तीची किडणी वडिलांनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लालू आणि त्यांची मुलगी काही वेळापूर्वी सिंगापूरहून परल्यानंतर माहिती देण्यात आली आहे.

राजद नेते लालू प्रसाद यादव हे सध्या किडनीच्या समस्येने त्रस्त आहेत. सध्या ते दिल्लीत असून लवकरच किडनी प्रत्यारोपणासाठी पुन्हा सिंगापूरला जाणार आहेत. लालू प्रसाद यादव यांची किडनी याच महिन्यात प्रत्यारोपण होणार आहे. त्यांची मुलगी रोहिणी आपली किडनी लालूंना देण्याचे ठरले आहे.

सिगापुरात होणार पुढील उपचार

सध्या लालू प्रसाद यादव दिल्लीत आहेत. किडनीच्या समस्येमुळे लालूंनाही अनेक आजार झाले आहेत. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मिळालेल्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव यांचे किडनी प्रत्यारोपण लवकरच केले जाणार आहे. किडनी दाता त्यांचीच मुलगी रोहिणी आचार्य आहे. रोहिणी आचार्य या लालू आणि राबडीदेवी यांची दुसऱ्यानंबरची कन्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!