Just another WordPress site

‘अमृता फडणवीस उर्फ मामीला मेंदूच्या सर्जरीची गरज’, कॉंग्रेस आक्रमक

पुणेः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. पुण्यामध्ये काँग्रेसने आंदोलन करीत अमृता फडणवीस यांच्या त्या विधानाचा समाचार घेतला.

”आपल्या भारत देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत, महात्मा गांधी हे जुन्या भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत’ असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते.अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित ‘अभिरूप न्यायालयात’ त्यांनी हे विधान केलं.

आज पुण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. अमृता फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने घोषणाबाजी केली. पुण्यातील गुडलक चौकात काँग्रेसच्या महिला कार्यर्त्यांनी आंदोलन केलं. ‘अक्कल कमी जीभ लांब’ अशा घोषणा दिल्या. तसेच अशा मजकुराचा पाट्या काँग्रेसकडून यावेळी झळकवण्यात आल्या.

“अमृता फडणवीस उर्फ मामीला मेंदूच्या सर्जरीची गरज होती. पण मामीने तोंडाची सर्जरी केली. त्यामुळे राष्ट्रपिता आणि राष्ट्रविक्रेता यातला फरक त्यांना कळला नाही” अशी टीका महिला काँग्रेसकडून करण्यात आली. यावेळी शेकडो महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!