Just another WordPress site

वाशीममध्ये खासगी बसचालकांची मुजोरी; पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज; खासगी थांब्यामुळे नागरिकांना मनस्ताप

 

वाशीम : समृध्दी महामार्ग (Samrudhi Highway) असो वा इतर राष्ट्रीय राज्य महामार्गावरुन (State Highway) खासगी लक्झरी (Private bus) बस सुसाट धावत असल्याने अनेक अपघात घडले. या प्रकाराला आळा घालण्यासाठी उपप्रादेशीक परिवहन विभाग (Sub-Regional Transport Department) व पोलीस प्रशासनाकडून (Police Administration) प्रयत्न केल्या जात असल्याचे भासविल्या जाते. मात्र, लांबपल्याच्या खासगी बस मार्गातील प्रत्येक शहरात परवानगी नसताना थांबा घेवून प्रवाशी घेत असताना याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्या जाते. असाच प्रकार वाशीममध्ये बिनदिक्कतपणे सुरु असताना कारवाई होत नसल्याने अकोला नाका परिसरातील खासगी बसचा थांबा शहरवासियांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या वाहनचालकांकडून पोलीस अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याचे सांगून केल्या जाणाऱ्या मुजोरीमुळे अनेक वादाच्या घटना घडल्या असून किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहेत. (Arbitrariness of private bus drivers in Washim The need for attention by the police administration)

समृध्दी महामार्गावरील अपघातात खासगी बसमधील २५ निरपराधांचा अक्षरशः कोळसा झाला. या घटनेने अवघ्या महाराष्ट्रात शोकलहर पसरली. तर राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह प्रमुख राजकीय पक्षाचे पुढारी व सामाजिक नेत्यांनी अपघाताची आपापल्यापरीने कारणमिमांसा केली. रस्त्यांवरील अपघात नेमके कशामुळे घडतात हा संशोधनाचा विषय असला तरी अशा अपघातात होणाऱ्या जीवितहानी रोखण्यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, यवतमाळ, नागपूर, अमरावती, नांदेड, हिंगोली आदि शहरांतून पुणे, मुंबई, सुरत या महानगरांसाठी धावणाऱ्या खासगी वाहनांची संख्या मोठी आहे. सदर खासगी लक्झरींना मार्गात थांबून प्रवाशी घेणे अथवा उतरविणे नियमबाह्य असून कायद्याचे उल्लंघन आहे.

‘Rimjhim Gire Saawan’ गाणं ट्विट करत आनंद महिंद्रा म्हणाले, ‘आयुष्य तुम्हाला हवं तसं…’ 

परंतू मागील कित्येक वर्षांपासून वाशीम शहरातून जाणाऱ्या खासगी लक्झरी बस ठिकठिकाणी उभ्या राहून प्रवाशी घेतात. विशेष म्हणजे, हिंगोली नाका, पुसद नाका, अकोला नाका याठिकाणी या खासगी लक्झरींचा थांबा बनला आहे. त्यामुळे वर्दळीच्या वेळी ही वाहने रस्त्याच्या मधोमध उभी केल्या जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा वाशीमकरांसाठी नविन बाब राहिली नाही. विशेष म्हणजे, या चौकांमध्ये शहर व जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर असतात. मात्र, या खासगी लक्झरी वाहनचालक अथवा मालकांना नियम सांगण्याचे धाडस त्यांच्याकडून केल्या जात नाही. याठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या वेळी सर्वसामान्यांने विचारणा केल्यास लक्झरी चालक व कर्मचारी अरेरावी करीत असल्याने वादाच्या घडना घडल्या आहेत. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांशी आपली लगट असल्याचे सांगून लक्झरी चालक मुजोरी करीत असल्याचा आरोप होवू लागला आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देवून वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी खासगी लक्झरी वाहनांचे थांबे निश्चित करुन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होवू लागली आहे.

चाणक्य ट्रॅव्हल्सचा सर्वाधिक त्रास
शहरातील अकोला नाका परिसरात प्रमुख मार्गावर अनेक लक्झरी रस्त्याच्या कडेला लावून प्रवाशांची चढउतर केल्या जाते. मात्र, चाणक्य ट्रॅव्हल्स येथील पेट्रोल पंपा समोर रस्त्यात आडवी लावण्यात येते. याठिकाणी विविध वाहनातून येणारे प्रवाशी व उतरणाऱ्या प्रवाशांची एकच गर्दी होते. परिणामी, या मार्गावरुन वाहन नेणे जिकिरीचे झाले आहे. या संदर्भात लक्झरी चालकास विचारल्यास शहर ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अपना यार है! चिंता की बात नही म्हणून मुजोरी करीत असल्याने वादाच्या घटना घडल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी लक्झरी बसची तपासणी व थांबा नसताना प्रवाशांची ने-आण करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई होणे गरजेचे झाले आहे.

शहरातून जाणाऱ्या लक्झरी बस प्रमुख चौकात उभ्या राहत असल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात लक्झरी चालकांना सुचना देण्यात येतील. यानंतरही लक्झरी बस चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशिर कारवाई करुन शिस्त लावण्यात येईल.
– विजय जाधव, शहर वाहतूक निरीक्षक, वाशीम

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!