Just another WordPress site

.अन् जॅकी श्रॉफने अनिल कपूरच्या १७ वेळा कानशिलात लगावली; पाहा, ३० वर्षांपूर्वीचा मजेदार किस्सा

फिल्मी दुनियेत असे अनेक कलाकार आहेत जे परफेक्ट सीनसाठी ओळखले जातात. अनेक दिग्गज कलाकारांनी खूप संघर्ष करत मोठं यश मिळवलं. ज्यात अनिल कपूर यांचं देखील नाव आहे. बॉलिवूडचा लखन म्हणजेच अनिल कपूर हे आज आपला वाढदिवस साजरा करताहेत. बॉलिवूडमध्ये अनिल कपूर यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. मनोरंजन विश्वातील एक सर्वात फिट अभिनेता म्हणून अनिल कपूर यांच्याकडे पाहिले जातं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चित्रपटाच्या सेटवरचा एक खास किस्सा आपण जाणून घेऊयात.

अभिनेते अनिल कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिलेत. त्यांनी आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून आणि खास स्टाईलने चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. जवळजवळ चार दशकांहून अधिक काल चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या अनिल कपूर यांचा आज ६६वा वाढदिवस आहे. अनिल कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. आणि आता या वयातही केवळ चरित्र अभिनेता म्हणून एका चौकटीत न अडकता अनिल कपूर यांनी व्यावसायिक चित्रपट आणि समांतर चित्रपट यांच्यात अगदी योग्य समतोल साधला.
सिनेमाजगतात ज्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले जातात, ते मित्र म्हणजे, अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ. त्या काळात अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांची जोडी लोकप्रिय होती. त्यांनी एकत्र अनेक चित्रपट केले. त्या दोघांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले ते म्हणजे चित्रपट ‘राम लखन’च्या माध्यमातून. या चित्रपटात दोघांनी ऑनस्क्रिन ब्रदर्सची भूमिका साकारली आणि चित्रपटांत दाखवण्यात आलेल्या भावांमधील प्रेमाला प्रेक्षकांनी देखील डोक्यावर घेतलं होतं. आज देखील राम लखन चित्रपट तितक्याचं आवडीने लोक पाहतात. या जोडीच्या नावावर अनेक हीट चित्रपटांची नोंद करण्यात आली. ‘त्रिमूर्ति’, ‘युद्ध’, ‘अंदाज अपना’, ‘रूप की रानी चोरों का राजा’ आणि ‘कभी ना कभी’ यासारख्या चित्रपटांचा यात समावेश आहे. पण एकदा एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी एक सीन पूर्ण करण्यासाठी जॅकी श्रॉफ यांनी अनिल कपूर यांच्या एकदा-दोनदा नाही तर तब्बल १७ वेळी कानशिलात लगावली. गंमत वाटली ना? पण हे खरंय. या गोष्टीची कबुली खुद्द जॅकी श्रॉफ यांनीच दिली होती. अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांचा हा किस्सा ‘परिंदे’च्या शूटिंगवेळी घडला होता. चित्रपटाला ३० वर्षे पूर्ण झाल्यावर जॅकी श्रॉफ यांनी एका शॉटसाठी अनिल कपूर यांना सुमारे १७ वेळा थप्पड कशी मारावी लागली होती, याचा खुलासा एका कार्यक्रमात केला होता. ‘परिंदा’ चित्रपटात जॅकी श्रॉफ यांनी अनिल कपूरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये ते अनिल कपूरला थप्पड मारतात. जॅकी दादांनी या शॉटसाठी अनिल यांना थप्पड मारली, शॉट ओके झाल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं. पण अनिल कपूर यांना हा शॉट आवडला नाही, त्यामुळे त्यांनी पुन्हा हा शॉट शूट करण्याचा निर्णय घेतला. पण नंतर हा परफेक्ट शॉट येण्यासाठी अनिल कपूर यांना जॅकी श्रॉफकडून एक-दोन नव्हे तर तब्बल १७ थप्पड खाव्या लागल्या होत्या. याबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ यांनी सांगितलं होत की, “त्याला त्याच्या मोठ्या भावाने थप्पड मारली होती, हे दिसावं असं अनिलला वाटत होतं. खरं तर पहिला शॉट ठीक होता आणि एक्सप्रेशनही चांगले होते, पण अनिलला तो शॉट आवडला नाही आणि त्याने तो पुन्हा शूट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मी त्याला पुन्हा थप्पड मारली. मात्र, तरी त्याला आवडलं नाही, मग या शॉटसाठी मी त्याला तब्बल १७ थप्पड लगावले. मला त्याला मारायचं नव्हतं, पण मला मारावं लागलृं. कारण मी फक्त हवेत थप्पड मारले असते तर तो शॉट तितका चांगला आला नसता,” असं जॅकी श्रॉफ यांनी सांगितलं होतं.
विधु विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या क्लासिक चित्रपटात अनिल कपूर, जॅकी श्रॉफ यांच्याशिवाय, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट १९८९ रोजी रिलीज झाला होता. क्राईम ड्रामा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी खूपच डोक्यावर घेतला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!