Just another WordPress site

वर्षभरानंतर अनिल देशमुख कारागृहाबाहेर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण

मुंबई : शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर आज जामिनावर सुटका झाली. सुमारे १४ महिन्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झालीये. त्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी २०२१ मध्ये राज्याचे अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने प्राथमिक चौखसी केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर गुन्हा नोंद केला होता. दरम्यान, १७ दिवसांच्या स्थगितीच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात सीबीआयला अपयश आलं. सीबीआयला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख यांची सुटका झाली. कोर्टाची ऑर्डर तुरुंगाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर आणि सगळी संपूर्ण पुर्तता पार पडल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता अनिल देशमुख ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. एक वर्ष १ महिना आणि २७ दिवस त्यांना तुरुंगात रहावं लागलं. अनिल देशमुख कारागृहाबाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी अनिल भाऊ आगे बडो, हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!