Just another WordPress site

कोरोनानंतर आढळला मेंदू खाणारा अमिबा, दक्षिण कोरियात पहिला मृत्यू; कशी होते लागण? काय आहेत लक्षणं?

जगभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा थैमान घालत असतानाच आता आरोग्य यंत्रणा या परिस्थितीशी दोन हात कसे करायचे यावर विचार करताहेत. हे कोरोनाचं संकट शमत नाही, तोच आणखी एका संकटाची चाहूल लागलीये. दक्षिण कोरियात प्रथमच दुर्मिळ आणि संभाव्य प्राणघातक मेंदू खाणारा अमिबा सापडला. या दुर्मिळ अमिबामुळं अलीकडंच एका ५० वर्षीय व्यक्तीचा व्यक्तीचा मृत्यू झाला.

या जीवसृष्टीत असे काही परजीवी आहेत, जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे अमिबा. हो तोच अमिबा ज्याच्याबाबत आपण शाळेच्या पुस्तकात शिकलो आहोत. अमिबा हा एकपेशी परजीवी आहे. पण हा जीव मानवी शरीरात गेल्यात किती खतरनाक ठरू शकतो याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. दक्षिण कोरीयात एका व्यक्तीचा या अमिबामुळं गंभीर दुर्मिळ इन्फेक्शन झालं. आणि त्याचा मृत्यू झाला. कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध एजन्सीने सांगितले की, हा माणूस चार महिने थायलंडमध्ये घालवल्यानंतर १० डिसेंबर रोजी दक्षिण कोरियाला परतला होता आणि २१ डिसेंबर रोजी दुर्मिळ संसर्गामुळे त्याचा मृत्यू झाला.

काय आहे हा मेंदू खाणारा अमिबा?

मेंदू खाणारा हा अमीबा साधारणपणे तलाव, तळ, स्विमिंग पूल, नदी, गरम पाण्याचे झरे या ठिकाणी वाढतो. या अमिबाला नायग्रेलिया फौलेरी असंही म्हणतात. हा अमिबा नाकावाटे आपल्या शरीरात जातो. तसंच हा जास्त प्रमाणात दूषित पाण्यातही आढळत नाही. आतापर्यंतच्या माहितीनुसार, या अमीबाचे संक्रमण हे संसर्गजन्य नाही. मानवाकडून मानवाकडून प्रसार होणे सध्या शक्य नसले तरी, KDCA ने लोकांना गोड्या पाण्याच्या तलावांतील मासे खाण्यास आणि वॉटर स्पोर्ट्स मध्ये सहभागी होताना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिलाय.

नाकातून मेंदूमध्ये प्रवेश करते

दक्षिण कोरियामध्ये या आजारामुळे झालेला हा पहिला संसर्ग आहे. यापूर्वी १९६२ ते २०१८ पर्यंत युनायटेड स्टेट्समध्ये या अमिबाच्या संक्रमणाची १४३ प्रकरणे नोंदवली गेली होती, ज्यात बहुतांश मृतांची संख्या ही दक्षिणेकडील राज्यांमधील आहे. हा अमीबा नाकातून श्वास घेतो आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. हा अमिबा इतका खतरनाक आहे की एकदा का तो मेंदूपाशी पोहोचला की, मेंदूच्या पेशीही खातो.

केडीसीएने इशारा दिला

केडीसीएने सांगितलं की, नायग्रेलिया फौलेरीचा संसर्ग रोग नाही. मात्र, स्थानिक रहिवाशांना हा रोग पसरलेल्या भागात जाण्यापासून निर्बंध घालण्यात आले. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार या अमिबामुळे दूषित झालेलं पाणी प्यायल्याने काही धोका नाही, मात्र हे पाणी तुमच्या नाकात गेलं तर ते जीवघेणं ठरू शकतं. कारण हा अमिबा नाकावाटे मेंदूत प्रवेश करतो. अमेरिका, भारत आणि थायलंडसह जगभरात २०१८ पर्यंत नायग्रेलिया फौलेरीचे एकूण ३८१ प्रकरणे नोंदवली गेलीत. .

लक्षणे काय आहेत?

जेव्हा एखाद्या व्यक्तीला नायग्रेलिया फौलेरीची लागण होते पाच दिवसांच्या आत याची लक्षणं दिसतात. आणि त्यात सुरुवातीला डोकेदुखी, ताप, मळमळ आणि उलट्या या लक्षणांचा समावेश असतो. याशिवाय, मान ताठ होणे, फिट येणे ही देखील लक्षणं असतात. गंभीर प्रकरणांमध्ये, संक्रमित व्यक्ती कोमात जाऊ शकते. या अमिबाचा संसर्ग तपासणारी कुठलीही चाचणी सध्या उपलब्ध नाही. त्यामुळं अनेकदा मृत्यू होऊ शकतो. या दुर्मिळ संसर्गाचा मृत्यू दर सुमारे ९७ टक्के आहे.

दरम्यान, सध्याच्या घडीला या संसर्गाचे आणखी रुग्ण समोर आले नसले तरीही सावधगिरी बाळगणं कधीही शहाणपणाचं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!