Just another WordPress site

‘काय मालिश, काय पलंग..’ मज्जाच मज्जा; जेलमध्ये असलेल्या मंत्र्याला VIP ट्रिटमेंट; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन सध्या तिहार जेलमध्ये मुक्कामी आहे. पण कोठडीमध्ये सत्येंद्र जैन यांची कशा प्रकारे सेवा सुरू आहे, याचा व्हिडीओ समोर आला आहे. सत्येंद्र जैन जेलमध्ये पायाची मालिश करून घेत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. मनी लॉड्रिंगच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. त्यांची रवानगी ही तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.

जेलमध्ये असताना सत्येंद्र जैन यांचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. जैन हे मस्तपैकी एका पलंगावर झोपून एका व्यक्तीकडून मालिश करून घेत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या कोठडीमध्ये इतर लोकही दिसून आले आहे. हा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ सप्टेंबर महिन्यातला आहे. ईडीने कारवाई केल्यानंतर सत्येंद्र जैन यांना मंत्रिमंडळातून हटवण्यात आलेलं नाही. अजूनही ते बिनाखात्याचे मंत्री आहे.

एवढंच नाहीतर जैन हे वेगवेगळ्या टीशर्टमध्ये असल्याचे दिसून आले आहे. त्यांना जेलमध्ये व्हीव्हीआयपी सेवा मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे नेते हरीश खुराना यांनी आरोप केला आहे की, जैन यांना जेलमध्ये मिनरल वॉटर मिळत आहे. जैन यांना अनेक लोक भेटत आहे. यावर तातडीने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी खुराना यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!