Just another WordPress site

नोरा फतेहीबरोबर सहकलाकाराने केले गैरवर्तन अन् दोघांमध्येही सेटवरच झाले भांडण; खुद्द नोरानेच केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जेव्हा जेव्हा बी टाऊनच्या सर्वात सुंदर अभिनेत्रीचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यात नोरा फतेहीचे नाव समोर येते. केवळ सौंदर्यच नाही तर नोरा फतेही इंडस्ट्रीतील टॉप डान्सर्सपैकी एक आहे. नोरा फतेहीने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली. आपल्या हटके अंदाजामुळं आणि डान्समुळं कायम चर्चेत असणारी नोरा फतेही पुन्हा एकदा चर्चेत आली. सध्या नोरा तिच्या डान्ससाठी नाही तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख आहे. काहींनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकलीत. तर काहींनी डान्सने प्रेक्षकांना आकर्षित केलं. या यादीमधील एक अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सध्या चर्चेत आहे. नोरा नुकतीच ‘द कपिल शर्मा या कार्यक्रमात दिसून आली. हा छोट्या पडद्यावरील बहुचर्चित शो आहे. या शोमध्ये कलाक्षेत्रामधील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावताना दिसतात. गेल्या भागामध्ये अभिनेत्री-डान्सर नोरा फतेहीने कपिल शर्माच्या या शोमध्ये उपस्थिती दर्शवली होती. ती अॅन अॅक्शन हीरो या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. तिच्यासोबत आयुष्मान खुराना आणि जयदीप अहलावत देखील हजर होते. या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. दरम्यान तिने सहकलाकारासोबतच्या वादाचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकूण सर्वांनाचा धक्का बसला.
या कार्यक्रमात नोराने खूप धमाल-मस्ती केली. शिवाय कपिलबरोबर अनेक चर्चाही रंगल्या. गप्पा रंगात आल्या असताना कपिलने नोराला मजेशील अंदाजात ‘तुझं कधी कोणत्या सहकलाकारासोबत भांडण झालं आहे का?’ असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देत नोराने एक किस्सा सांगितला. तिचा हा किस्सा ऐकून सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. कपिलने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत नोरा म्हणाली, “बांग्लादेशात एका सिनेमाचे शूटिंग करत होते. शूटिंगदरम्यान सह-कलाकाराने माझ्याशी गैरवर्तन केले. त्यावेळी कसलाच विचार न करता मी त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्यानेही माझ्या कानशिलात लगावली. मी पुन्हा त्याला थप्पड मारली तर त्याने माझे केस ओढले.” नोराचा हा किस्सा ऐकून सर्वांचा धक्का बसला आहे.

दरम्यान, कामाविषयी बोलायचे झाले तर नोराने ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘दिलबर’ या गाण्यामुळे तिला लोकप्रियता मिळाली. आता तिच्या डान्सची जादू सर्वत्र पाहायला मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!