Just another WordPress site

श्रद्धाचा मारेकरी आफताबची होणार पॉलिग्राफ टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय? ती कशी केली जाते?

सध्या देशभरात श्रद्धा हत्येप्रकरणी तीव्र संतापाची लाट उसळली. आरोपी आफताब या प्रकरणात नवनव्या गुन्ह्यांची कबूली देतोय. मात्र, आफताब पोलिसांना कितपत खरं सांगतोय, यावर संशय घेतला जात आहे. त्यामुळे सुरवातीला त्याची नार्को टेस्ट केली जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र पोलिसांनी त्या अगोदर पॉलिग्राफ टेस्ट करण्याचं ठरवलं. त्यामुळे आता आफताबची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे. मात्र पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय? आणि ती कशी केली जाते? नार्को आणि पॉलिग्राफ टेस्टमध्ये नेमका फरक काय? याच विषयी जाणून घेऊ.

 

महत्वाच्या बाबी

१. सध्या देशभरात श्रद्धा हत्येप्रकरणी तीव्र संतापाची लाट
२. १९२४ पासून पोलीस तपासात पॉलिग्राफ टेस्टचा वापर
३. पॉलिग्राफ टेस्टचा सर्वात पहिला वापर १९२१ साली झाला
४. पॉलिग्राफ टेस्ट १०० टक्के अचूक आहे, हे सिद्ध झालं नाही

 

पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय?

पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे खोटं पकडण्याची चाचणी, ही विज्ञानात लावण्यात आलेल्या अनेक रंजक शोधांपैकी एक आहे. एखादा आरोपी खरं बोलतो, की खोटं हे शारीरिक क्रियांमधून तपासण्यासाठी पॉलिग्राफी टेस्ट केली जाते. यालाच लाय डिक्टेटर टेस्ट असंही म्हणतात.
पॉलिग्राफ टेस्ट दरम्यान आरोपीला पोलीस वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. यावेळी ब्लड प्रेशर, हार्ट रेट, पल्स रेट आणि शरीरवर येणार घाम तसेच हातापायांची हालचाल यावरून व्यक्ती खरं बोलतो आहे की नाही हे तपासलं जातं. व्यक्ती खोटं बोलते, तेव्हा तिचा रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वासोच्छवास आणि तापमानात बदल होतो. हे बदल तांत्रिक उपकरणांद्वारे तपासले जातात. १९२४ पासून पोलीस तपासात या चाचणीचा वापर केला जातो. नार्को टेस्ट प्रमाणेच ही पॉलिग्राफ टेस्टही वादग्रस्त आहे. महत्त्वाचं म्हणजे नार्को टेस्ट असेल किंवा पॉलिग्राफ टेस्ट, या दोन्हीही टेस्ट १०० टक्के अचूक आहेत, हे वैज्ञानिकदृष्टी सिद्ध झालेले नाही.

 

पॉलिग्राफ टेस्ट पहिल्यांदा कधी केली?

पॉलिग्राफ टेस्टचा सर्वात पहिला वापर १९२१ साली अमेरिकेतील जॉन ऑगस्टस लार्सन या पोलिस अधिकारी आणि वैद्यकीय अभ्यासकाने केला. एखादी व्यक्ती खरं बोलत असेल तेव्हा त्याचे रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वासोच्छवास, शरीराचं तापमान सामान्य असतं. परंतु, जेव्हा ती खोटं बोलते, तेव्हा या सर्व घटकांमध्ये बदल होऊ लागतात. रक्तदाब-नाडीचे ठोके वाढून श्वासोच्छवास जोराने होऊ लागतो, याच तत्त्वाचा वापर लार्सन यांनी केला. सन १९२१ मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील एका ख्रिश्चन धर्मगुरूची हत्या करण्याचा आरोप असलेल्या विल्यम हायटॉवर या व्यक्तीवर ही पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली.

 

पॉलिग्राफ टेस्ट कशी केली जाते?

पॉलीग्राफ चाचणी दरम्यान, मशीनचे चार किंवा सहा पॉइंट व्यक्तीच्या छातीवर आणि बोटांना जोडलेले असतात. व्यक्तीला आधी काही सामान्य प्रश्न विचारले जातात. यानंतर त्याला गुन्ह्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यादरम्यान मशिनच्या स्क्रीनवर मानवी हृदयाचे ठोके, रक्तदाब, नाडी यांचं निरीक्षण केले जाते. पॉलिग्राफ टेस्टपूर्वीही व्यक्तीची वैद्यकीय चाचणी केली जाते.

 

दोन्ही टेस्टमध्ये फरक काय?

नार्को टेस्ट दरम्यान संबंधित व्यक्तीच्या शरीरात ‘सोडियम पेंटोथल’ हे औषध इंजेक्शनद्वारे सोडलं जातं. तसेच या औषधाचा डोस त्या व्यक्तीचे वय, लिंग आणि इतर वैद्यकीय परिस्थितीवर अवलंबून असतो. हा डोस अचूक असणे आवश्यक असते, अन्यथा त्या व्यक्तीचा मृत्यू किंवा ती कोमामध्ये जाण्याची भीती असते. हे इंजेक्शन दिल्यानंतर ती व्यक्ती संमोहन स्थितीत पोहोचते. त्यानंतर डॉक्टर त्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याची परवानगी देतात. तर पॉलिग्राफ टेस्ट करताना आरोपीच्या शरिरावर सेंसर लावल्यानंतर त्याला प्रश्न विचारण्यात येतात. या प्रश्नांची उत्तरं देताना पॉलिग्राफ मशीनीद्वारे आरोपीचा रक्तदाब, नाडीचे ठोके, श्वासोच्छवासा दर आणि शरीराच्या तापमानात बदल तपासले जातात. त्यावरून ती व्यक्की खरं बोलते आहे, की खोटं, हे तपासले जातं.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!