Just another WordPress site

वरोरा तालुक्यात दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील चारगाव- वायगाव मार्गावरील झुडुपात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी (दि.११) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत हा भेंडाळा येथील रहिवासी असून, सदाशिव महाकुळकर असे त्याचे नाव आहे. शरीरावरील जखमांवरून त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सदाशिव महाकुळकर गुरूवारी सकाळी न्यायालयीन काम असल्याचे सांगून वायगाव येथील नातेवाईकांकडे जात असल्याचे सांगून बाहेर पडला होता. परंतु, तो नंतर आपल्या घरी पोहोचला नाही. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास चारगाव वायगाव मार्गावरील एका झुडुपात त्याचा मृतदेह नागरिकांना आढळून आला. या घटनेची माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार अविनाश मेश्राम हे तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.

सदाशिव महाकुळकर यांना दारूचे व्यसन होते. तसेच त्याच्याजवळ पैसे होते. पैशातून त्याच्यावर हल्ला झाला असावा, अशी चर्चा आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून तपासासाठी चंद्रपूर येथून श्वानपथक बोलाविण्यात आले. परंतु, आरोपींचा शोध लागला नाही. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली शेगावचे ठाणेदार अविनाश मेश्राम, पीएसआय प्रवीण जाधव, पीएसआय महादेव सरोदे, विठ्ठल वैद्य, राकेश तुरानकर, मदन येरणे, पुरुषोत्तम दातारकर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!