Just another WordPress site

मुलगी झाली हो…! आलियानंतर आता अभिनेत्री बिपाशा बसू झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म

मुंबई : अलीकडेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी एका सुंदर मुलीला जन्म दिला. रणबीर आणि आलियानंतर आता आणखी एका जोडप्याने आनंदाची बातमी शेअर केली. बी टाऊनचे ग्लॅमरस कपल म्हणून ओळखले जाणारे बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांच्या घरी लक्ष्मी आली. या जोडप्याने एका मुलीला जन्म दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहे. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. २०१६ मध्ये बिपाशा-करणचे लग्न झाले. त्यानंतर या वर्षी ऑगस्टमध्ये अभिनेत्री बिपाशा बसूने सोशल मीडिया पोस्टद्वारे गरोदरपणाची गोड बातमी शेअर केली होती. तेव्हापासून या कपलने अनेकदा ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. दरम्यान, बिपाशाने आज सकाळी वयाच्या ४३ व्या वर्षी एका सुंदर मुलीला जन्म दिला. लग्नाच्या सहा वर्षानंतर करण आणि बिपाशा आई-वडील झाले. ही बातमी समोर येताच बिपाशा आणि करण दोघांचेही चाहते खूप आनंदी झाले असून या जोडप्याला चाहते आणि सेलिब्रिटींकडून खूप शुभेच्छा आणि प्रेम मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!