Just another WordPress site

भारतीय पोस्ट खात्यात बंपर भरती, तब्बल 30,041 हजार जागा भरणार, कोण करू शकतो अर्ज? वाचा.

Indian Postal Department Recruitment 2023 : पोस्ट खात्यात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनासाठी एक गुड न्यूज आहे. भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकाच्या (GDS) 30 हजार 041 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी कोणत्याही परीक्षेशिवाय उमेदवारांची निवड केली जाईल. 10वी उत्तीर्ण उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतील. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 3 ऑगस्ट 2023 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट आहे. उमेदवार 24 ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधीत फॉर्ममध्ये दुरूस्ती करू शकतील. (Bumper recruitment in India Post Department 2023 for 30,041 thousand post last date to apply is 23rd August)

पदे– 30,041

पदांचे नाव-
ग्रामीण डाक सेवक, शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर या पदांवर ही भरती होणार आहे.

पात्रता:
इंडिया पोस्ट जीडीएस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
यासोबतच उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान आणि सायकल चालवण्याचे कौशल्य असावे.

वयमर्यादा :
जे उमेदवार इंडिया पोस्ट GDS भरतीमध्ये विविध पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांचे किमान वय 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे. याशिवाय OBC, EWS, SC, ST आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही नियमानुसार सूट दिली जाईल.

Akola News : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वाऱ्यावर; हजारो प्रकरणे थंडबस्त्यात : ४ महिन्यांपासून अध्यक्ष नाही 

अर्ज फी:
सर्वसाधारण, OBC आणि EWS श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु. 100 भरावे लागेल.
SC, ST, PWD आणि महिलांना या पदांच्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.

निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड त्यांच्या 10वीतील गुणांच्या आधारे केली जाईल.
त्यानंतर सदर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीसाठी मागवली जातील.

आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड, 10वी गुणपत्रिका, मूळ पत्ता पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, जात प्रमाणपत्र, PWD प्रमाणपत्र (असल्यास)

अर्ज करा कसा कराल?
इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जा.
होमपेजवर नोंदणी पर्यायाच्या लिंकवर क्लिक करा.
नोंदणी केल्यानंतर, अर्जासोबत पुढे जा
त्यानंतर उमेदवारी अर्जाची फी भरावी
आवश्यक कागदपत्रे जोडा
अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंटआउट घ्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!