Just another WordPress site

‘नवनीत राणांना अटक का करत नाही, पोलीस मॅनेज झाले का?’, कोर्टाने पोलिसांना फटकारलं

मुंबई : अमरावतीच्या खासदार या ना त्या प्रकरणामुळे कायम चर्चेत असतात. अशातच बोगस जात पडताळणी प्रकरणामध्ये नवनीत राणा यांच्या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावेळी ‘कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे? पोलीस मॅनेज झाले का?’ असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना झापून काढलं.

खासदार नवनीत राणा यांचं बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने पोलिसांना खडेबोल सुनावले.

तक्रारदार जयंत वंजारी यांनी कोर्टाने नवनीत राणा विरोधात जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर पोलीस कारवाई करत नसल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणलं. त्यावर न्यायाधीशांनी पोलीस मॅनेज झाले का? असा सवाल केला.

कोर्टाने फटकारल्यानंतर, मुलुंड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी नवनीत राणा प्रकरणात कारवाई साठी वेळ मागितला. मात्र न्यायालयाने नाराजी व्यक्त करत म्हटलं की, न्यायालयाच्या आदेशाचा पालन होताना इथं दिसत नाही. कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहे? असं म्हणत पुन्हा एकदा झापून काढले. तसंच, न्यायालयाने पोलिसांनी अधिक वेळ देण्याची केलेली विनंती नाकारली.

या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्त आणि लोकसभा अध्यक्ष यांना सदर प्रकरणाबाबत पत्र लिहिण्याची पोलिसांना सूचना केली आहे. त्याचबरोबर संबंधित पोलीस उपायुक्त यांना या संदर्भात तातडीने कारवाई अहवाल सादर करण्याचा निर्देश दिले आहे. नवनीत राणा यांच्या प्रकरणात पुढील सुनावणी २८ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!