Just another WordPress site

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! पोस्टात ९८ हजारहून अधिक जागांसाठी बंपर भरती, १०वी-१२वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

मुंबई : दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी आली आहे. भारतीय टपाल विभागात ९८ हजारांहून अधिक पदांवर भरती होणार आहे. भारतीय टपाल विभागाने अधिकृत इंडिया पोस्ट वेब पोर्टलवर पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या भरती अंतर्गत एकूण ९८०८३ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्जाची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु डिसेंबर महिन्यापर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

रिक्त जागांचा तपशील

एकूण रिक्त पदे – ९८,०८३
पोस्टमन – ५९,०९९
मेलगार्ड – १,१४५
मल्टी-टास्किंग (MTS) – ३७,५३९
२३ मंडळ भरती

वयोमर्यादा

पोस्टमन, मेलगार्ड आणि मस्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार १८ ते ३२ वर्षे वयोगटातील असावेत. SC, ST, OBC, PWD आणि PH उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

श्रेणींसाठी सवलत

SC/ST – ५ वर्षांची सूट
ओबीसी – ३ वर्षांची सूट
EWC – NA, PW साठी १०वर्षांची सवलत
PWD SC/ST – १५वर्षे सूट

पात्रता

या भरती अंतर्गत, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी किंवा १२वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असावे.

अर्ज फी

या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराला १०० रुपये शुल्क भरावे लागते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!