Just another WordPress site

क्रेडिट कार्ड धारकाचा मृत्यू झाला तर त्यानं घेतलेल्या कर्जाचं काय होतं? ते कर्ज त्याच्या कुटुंबाला फेडावं लागतं का?

एखादी आपत्कालीन परिस्थिती ओढवली असेल आणि जवळ पैसे नसतील, तर पूर्वीचे लोक हे सावकारांकडून पैसे घ्यायचे. कालांतराने ही परिस्थिती बदलली आणि सावकारांची जागा बँकांनी घेतली. पूर्वी कर्ज घेण्यासाठी बँकांची प्रक्रिया खूप किचकट असायची, मात्र, आता बॅंकाकडून अगदी सहज कर्ज मिळतं.आता तर देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढलाय. क्रेडिट कार्डचा वापर करुन पैसे नसतांनाही लोक वस्तू खरेदी करतात. आणि नंतर त्याचे पैसे पुन्हा बँकेला देतात. पण क्रेडिट कार्ड धारकाचा मृत्यू झाला तर त्यानं घेतलेल्या कर्जाचं काय होतं? याच विषयी जाणून घेऊ.

कोणतंही मोठ काम करायचे म्हटलं तर त्यासाठी पैसे लागतात. आणि अचानक एवढे पैसे माणूस जमवू शकत नाही. त्यासाठी त्याला बँकेकडून कर्ज घेण्याची आवश्यकता पडते. पैशाची अर्जंट गरज असल्याने कर्जदार बँकेकडून कर्ज घेतात. आता तर देशातील मोठ्या शहरांबरोबरच छोट्या शहरांमध्येही क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापराकडे लोकांचा कल वाढतोय. या कार्डच्या माध्यमातून तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून पैसे घेऊ शकता. या कार्डचा वापर करण्यासाठी तुमच्या बँकेत पैसे असणं गरजेचं नसतं. तुम्ही आधी बँकेकडून उसने पैसे घेऊन त्याचा वापर करु शकता. थोडक्यात काय तर तुमच्या खात्यात पैसे नसतानाही तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरून खरेदी, ऑनलाइन पेमेंट आणि इतर खर्च करता येतो. यामुळे अनेकांचं आयुष्य थोडं सोप झालंय. पण याचा योग्य वापर करणं देखील गरजेचं आहे. फायदे कितीही असले तरी क्रेडिट कार्ड हे देखील एक प्रकारचे कर्ज आहे, हे ही खरं आहे. ते वेळेवर न भरल्याने बँका ह्या तुम्ही घेतलेल्या पैशावर व्याज दर आकारतात.
बऱ्याचदा क्रेडिट कार्डच्या मदतीने लोक शॉपिंग करतात आणि मग ठराविक वेळेत ते कर्ज परत भरू शकत नाहीत. त्या कर्जामुळे टेन्शन तर असतंच, शिवाय क्रेडिट स्कोअर खराब होतो. त्यामुळे पुढे जाऊन त्यांना लोन मिळवण्यात अडचणी येतात.
नियमांनुसार, क्रेडिट कार्डचं बिल न भरल्यास ग्राहकांना मोठा दंडही भरावा लागू शकतो. बहुतेक क्रेडिट कार्ड कंपन्या बिल न भरल्याबद्दल ग्राहकांकडून वार्षिक ४० टक्के दंड आकारतात. पण समजा, क्रेडीट कार्ड वापरणाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कर्जाचं काय होतं, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. खरंतर कर्जाचे वेगवेगळे प्रकार असतात. घरासाठी घेतलेलं कर्ज, वाहनासाठी घेतलेलं कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज हे ते कर्जाचे प्रकार. या प्रकारचं कर्ज वसूल करणं बँकेसाठी सोपं असतं. कारण ते कर्ज देताना संबंधित मालमत्ता बँकेच्या नावावर असते. त्यामुळं कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तरी त्याचा बँकेवर परिणाम होत नाही. बँक कोणत्याही परिस्थितीत त्यांचे पैसे वसूल करतात. मात्र, क्रेडिट कार्डे हे असुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवली जातात. यासाठी तुम्हाला कोणतीही जमीन, एफडी किंवा तुमची कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही. तर बॅंका अर्जदाराचे उत्पन्न, क्रेडिट स्कोअर, विद्यमान कर्ज आणि परतफेडीचा इतिहास याच्या आधारावर कार्डची क्रेडिट मर्यादा निश्चित केली जाते. तुमचं उत्पन्न जितकं जास्त तितकी क्रेडिट मर्यादा जास्त असते. क्रेडिट कार्डद्वारे खर्च केलेल्या रकमेची परतफेड करण्याची जबाबदारीही क्रेडिट कार्डधारकाची असते. मात्र, जर क्रेडिट कार्ड धारकाचा त्याने बॅंकेकडून घेतलेली रक्कम परत करण्यापूर्वी जर मृत्यू झाला, तर बँक कर्जाची थकबाकी राइट ऑफ करते. थोडक्यात काय तर, अशा परिस्थितीत मृत क्रेडिट कार्ड धारकाच्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला थकबाकी भरण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.
दुसरं म्हणजे, आजकाल अनेक सुरक्षित क्रेडिट कार्ड देखील उपलब्ध आहेत. सुरक्षित क्रेडिट कार्ड बहुतेक लोक घेतात. सुरक्षित क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी काहींना आपली एफडी बनवावी लागते आणि त्यावर कर्ज उपलब्ध केलं जातं. या केसमध्ये जर क्रेडिट कार्ड धारकाचा मृत्यू झाला तर बँकेला त्याचे मुदत ठेव खाते एनकॅश करून कर्ज वसूल करण्याचा अधिकार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!