Just another WordPress site

कोरोनाने हाहाःकार! मृतांचा ढिग, ऑक्सिजनही संपलं; चीनमधला झोप उडवणारा व्हीडिओ

चीनमध्ये कोरोनाने हाहाःकार माजला आहे. एका दिवसात साडेतीन कोटी कोरोना रुग्ण आढल्याच्या बातम्या काल आल्या होत्या. मात्र यापेक्षेही गंभीर स्थिती भविष्यात येणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

महामारी शास्त्रज्ञ आणि आरोग्यविषय अर्थशास्त्राचे अभ्यासक एरिक फेगल-डिंग यांनी एक दावा केला आहे. त्यानुसार चीनमधील ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या आणि जगातली १० टक्के लोकसंख्या पुढच्या ९० दिवसांमध्ये कोरोनाबाधित होईल.

एरिक यांनी सध्याचा चीनमधील एक व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये चीनमध्ये मृतांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. रुग्णालयात औषधं, बेड याच्या सुविधा मिळत नाहीत, ऑक्सिनजनही संपलं आहे. त्यामुळे मृत्यदर वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यांनी व्हीडिओ ट्विट करुन सांगितलं की, बीजिंगमधलं हे टॉप टियर लेव्हलचं रुग्णालयत आहे. तरीही इथे बेड आणि ऑक्सिजनही कमतरता आहे. आयसीयूत आलेल्या एका रुग्णाचा १५ मिनिटांमध्ये मृत्यू झाल्याचं एरिक यांनी नमूद केलं आहे.

दरम्यान, भारतामध्ये सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोविडच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतील तरी तीचं प्रमाणं खूप नाहीए. पण भविष्यातील धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रानं राज्यांना तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. नव्यानं काढलेल्या अॅडव्हाझरीत वैद्यकीय पायाभूत सुविधांची देखभाल आणि त्या पुन्हा अॅक्टिव्ह करण्याबाबतचे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!