Just another WordPress site

नगरच्या जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन, 30 नोव्हेंबर वाचकांना घेता येणार लाभ

अहमदनगर-  दिवाळी (Diwali) म्हटले की फराळ, फटाके आठवतातच मात्र मराठी वाचनप्रिय मडंळींना दिवाळीची उत्सुकता असते ती दिवाळी अंकांसाठी. दिवाळीचा खुसखुशीत फराळ करताना विनोदी, चुरचुरीत वाचायला मिळावे, ही वाचकांची अपेक्षा दिवाळी अंक पूर्ण करतात. दिवाळी अंकामध्ये सर्व विषयांचा समावेश असतो. शिवाय, त्यात अनेक लेखकांचा त्यामध्ये सहभाग असतो, त्यामुळे ही साहित्यकृती एक परिपूर्ण साहित्य कृती असून ती रसिक वाचकांसाठी मेजवानी असते. त्याचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लेखक गीताराम नरवडे (Geetaram Narvade) यांनी केले.

ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अहमदनगर येथे दीपावली विशेष अंक उद्घाटन उद्घाटक म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर होते.  यावेळी  विविध विषयांवरील दीपावली विशेष अंकांचा सहभाग आहे. हे दिवाळी अंकांचे प्रदर्शन 30 नोव्हेंबर पर्यंत शासकीय सुट्ट्या बघून सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांनी सांगितले. त्यात या प्रदर्शनात विविध विषयावरील नामांकित प्रकाशकांचे आणि नवोदित प्रकाशकांचे दोनशेच्या वर दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत. यामध्ये साहित्य विषयक, विनोदी, महिलांसाठी, ज्योतिष विषयक, आरोग्य विषयक, क्रीडाविषयक रहस्यकथा, अध्यात्मिक मुलांसाठी, स्पर्धा परीक्षा ,पाककृती, चित्रपट, पर्यटन, शैक्षणिक ,कथा असे वाचनीय दिवाळी अंक उपलब्ध आहेत.  हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तांत्रिक सहाय्यक हनुमान ढाकणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शैलेश घेगडमल यांनी केले. यावेळी  अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे ग्रंथपाल अमोल इथापे, संतोष वाडेकर, कुमार कुंटला, रामकृष्ण सोनाळे, ओंकार फुलकर संकेत मेहुल आदींसह बहुसंख्य रसिक वाचक उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!