Just another WordPress site

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम करणार भारतावर मोठा हल्ला, NIA ने केला खुलासा

नवी दिल्ली : दाऊदची डी कंपनी भारताविरोधात मोठ्या हल्ल्याचा कट आखत आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) याबाबत मोठा खुलासा केला आहे. टेरर फंडिंग प्रकरणात ही माहिती उघड झाली आहे. NIA ने केलेल्या चार्जशीटमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे.

NIA ने दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) जवळचा मानला जाणारा छोटा शकील भारतात हल्ले करण्याची शक्यता आहे. दाऊदने यासाठी पैसे देखील पाठवले असल्याची माहिती NAIने दिली आहे. दाऊदने या कारवायांसाठी पाकिस्तानहून दुबईला आणि दुबईहून सूरत आणि मुंबईला २५ लाख रुपये पाठवले आहेत. ही रक्कम आरिफ शेख आणि शब्बीर शेख या व्यक्तींना पाठवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गेल्या ४ वर्षात हवाल्याच्या माध्यमातून १२ ते १३ कोटी रूपये पाठवल्याचा माहितीही समोर आली आहे.

NIAने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रशीद मारफानी उर्फ ​​रशीद भाई हा हवाला मनी ट्रान्सफरचे काम करत होता. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांचे पैसे तो दुबईत भारतात पाठवायचा, ही माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

आरोपपत्रात दाऊद, शकील, त्याचा मेहुणा सलीम फल, आरिफ शेख आणि शब्बीर शेख यांची नावे आहेत. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने आपल्या आरोपपत्रात सांगितले की, दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून २५ लाख रुपये भारतात कसे पाठवले गेले. एनआयएने दावा केला आहे की शब्बीरने ५ लाख रुपये ठेवले होते आणि उर्वरित रक्कम एका साक्षीदारासमोर आरिफला दिली होती. ९ मे २०२२ रोजी शब्बीरच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडून ५ लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे एनआयएने म्हटले आहे.

अनेक शहरे डी कंपनीच्या टार्गेटवर होती

एनआयएच्या आरोपपत्रानुसार, भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला देशातील बडे राजकारणी आणि अनेक बड्या व्यक्तींना लक्ष्य करायचे होते. एवढेच नाही तर भारतातील विविध शहरांमध्ये दंगल घडवण्यासाठी दाऊदने मोठी रक्कमही पाठवली होती. त्यामध्ये भारताची राजधानी नवी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई पहिल्या यादीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!