Just another WordPress site

जिममध्ये व्यायाम करताना टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचे निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

काही दिवसांआधीच कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं जीममध्ये वर्क आऊट करत असताना निधन झालं. त्यानंतर अभिनेता सलमान खानच्या बॉडी डबलचाही जीम वर्कआऊटनंतर मृत्यू झाला. आता टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी यांचं आज सकाळी निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार, जीममध्ये वर्कआऊट करत असताना अचानक तो खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं मृत्यू झालाचं सांगण्यात आलं. अभिनेता सिद्धांत हा ४६ वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूपश्चात त्याची पत्नी आणि दोन मुलं आहेत. सिद्धांतचं खरं नाव हे आनंद सूर्यवंशी असं आहे. त्यानं काही दिवसांआधीच त्याचं नावं सिद्धांत सूर्यवंशी असं केलं होतं.

अभिनेता जय भानुशालीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिद्धांतच्या निधनाची माहिती दिली. सिद्धांतचा फोटो शेअर करत भाई तू आम्हाला सोडून फार लवकर निघून गेलास असं म्हटलं आहे. मला आमच्या एका कॉमन मित्राकडून सिद्धांतबद्दल कळलं. जीममध्ये वर्कआऊट करताना त्याला हृदयविकाराचा झटका आला असं त्यानं सांगिलतं. अशी माहिती जय भानुशानीलं इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी हा हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा होता. कुसूम, कसोटी जिंदगी की सारख्या हिट मालिकेत सिद्धांतनं काम केलं आहे. त्याचप्रमाणे सुफियाना इश्क मेरा, जिद्दी दिल मानेना, सात फेरे सलोनी का सफर, क्यू रिश्ते मे कट्टी बट्टी या त्याच्या प्रसिद्ध टेलिव्हिजन शोमध्ये सिद्धांतनं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

सिद्धार्थ सूर्यवंशीनं दोन लग्न केलं. त्याचं पहिलं लग्न इरा चौधरीबरोबर झालं होतं. इरा मीडिया फिल्ममध्ये काम करत होती. पहिल्या पत्नीपासून सिद्धांतला दीजा ही मुलगी आहे. त्यानंतर सिद्धांतनं मॉडल एलिसिया राऊतबरोबर दुसरं लग्न केलं. एलिसियापासून सिद्धांतला मुलगा आहे. सिद्धांत पत्नीबरोबर मॉडल्सना ट्रेनिंग देण्याचं काम करत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!