Just another WordPress site

डोकेदुखीनं हैराण आहात?, मग हे घरगुती उपचारने दूर करा डोळेदुखी; नक्की ट्राय करा ‘या’ Tips

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत डोकेदुखी एक सामान्य समस्या बनली आहे. डोकेदुखीची तशी अनेक कारणे आहेत. बऱ्याच लोकांना मायग्रेनचा त्रास होतो आणि बऱ्याचदा डोकेदुखीचा त्रास होतो. जेव्हा डोकेदुखी जाणवते तेव्हा त्यापासून मुक्त होण्यासाठी काहीही करण्यास तयार होत असतो. पण डोकेदुखीवर काही घरगुती उपाय असे आहेत, की जे फायदेशीर ठरत असतात. परंतु, अनेकांना या टिप्सबद्दल माहिती नाही. बहुतेक लोक डोकेदुखीच्या उपचारांसाठी मेडिकलवर जावून औषधे घेत असतात. मात्र डोकेदुखी कमी करण्याचा नैसर्गिक उपाय म्हणजे औषध मुक्त मार्ग आहे. हे घरगुती उपचार डोकेदुखी टाळण्यास मदत करतात किंवा त्यांची तीव्रता कमी करण्यास मदत करतात. जर तुम्हाला डोकेदुखीसारखी समस्या उद्भवत असेल तर आज आम्ही यावरील काही प्रभावी उपायांबद्दल सांगणार आहोत.

लसणाच्या पाकळ्या

डोकेदुखीचा त्रास होत असेल तर काही पाकळ्या लसणांच्या खा.. रोज लसणाच्या काही पाकळ्या चघळल्याने डोकेदुखीची समस्या दूर होते.

दालचिनीचा लेप

हिवाळ्यात जर का तुम्हाला डोकेदुखीची समस्या दूर करायची असेल तर डोक्याला दालचिनीची लेप लावा. यामुळे डोकेदुखी कमी होऊ शकते. यासाठी दालचिनी बारीक करून कपाळावर लावा आणि काही वेळ राहू द्या. यामुळे डोकेदुखी कमी होऊ शकते.

बदाम

डोकेदुखी कमी करण्यासाठी बदाम तुमच्यासाठी आरोग्यदायी आहे. यासाठी बदाम रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी ते बदाम बारीक करून त्यात थोडे गरम तूप मिसळून खावे. यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होऊ शकते.

धने आणि खडी साखरेचा काढा

डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी धन आणि खडी साखरेचा काढा प्या. हा काढा आपल्यासाठी आरोग्यदायी ठरतो. हा काढा तयार करण्यासाठी १ कप पाणी घेऊन ते चांगले उकळवा. यानंतर त्यात १ चमचे धने आणि १ चमचे खडी साखर मिसळा. आता हे पाणी चहासारखे प्या. यामुळे खूप फायदा होईल.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!