Just another WordPress site

नाकातलं इन्फेक्शन ठरू शकतं जीवघेणं! असहनीय सायनसवर तातडीनं करा ‘हे’ उपाय

हिवाळा येताच अनेकांची नाकं वाहायला लागतात. पण काहीवेळा नाकात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवतात. नाक वाहण्यासोबतच नाकाला सूज येते. असं असेल तर नाकात फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. यावर वेळीच उपचार न केल्यास ते जीवघेणं ठरू शकतं. याला फंगल सायनुसायटिस म्हणतात. फंगल सायनुसायटिस हे सायनस इन्फेक्शन आहे. दरम्यान, सायनस म्हणजे काय? त्याची लक्षणं काय? त्यावर उपाय काय? याच विषयी जाणून घेऊ.

सायनस म्हणजे काय?

सायनस म्हणजे शरीराला झालेलं एक प्रकारचं इन्फेक्शनच असतं. तुम्हाला ठाऊक असेल की, आपली मानवी कवटी शंखाप्रमाणे पातळ आणि पोकळ हाडाने बनलेली आहे. या पोकळींमध्ये डोळे, कान, नाक अशी संरचना आढळते. शिवाय या व्यतिरिक्त इतरही काही रिक्त जागा आहेत, ज्याचा संपर्क थेट नाकासोबत होतो. रिकाम्या मडक्यात आवाजाचा जसा इको तयार होतो, अगदी तसाच इको या रिक्त जागेत जमा झालेली हवा निर्माण करते. चेहऱ्याच्या आणि कवटीच्या हाडात असलेल्या या हवेच्या पोकळ्यांनाच सायनस असे म्हणतात. या सायनसच्या भिंतीमध्ये म्यूकस असतो. जेव्हा कोणताही बॅक्टेरिया येतो, तेव्हा ते त्याला अडकवतात आणि ते आतमधील हवा ओलसर ठेवतात. सायनसला वारंवार स्वच्छ करण्याची गरज पडते, मात्र, काही कारणास्तव ते बंद झालं किंवा सुजलं तर सायनस नीट काम करत नाही.

सामान्य लक्षणे काय?

नाकात फंगल इन्फेक्शन झाल्यास वास घेण्याची क्षमता राहत नाही आणि नाकातून दुर्गंधी येऊ लागते.
नाक वाहतं आणि तापही येतो. शिवाय, नाक लाल होतं. नाकाची त्वचा फुगते आणि ती नाजूक बनते आणि तसंच तिला स्पर्श केल्यावर खूप दुखतं. सायनस झाल्यावर डोळे आणि गाल सुजू लागतात. याशिवाय, डोकेदुखी, खोकला, कफ, ताप, थकवा, दात दुखणे ही सायनसची लक्षणं आहेत. तसंच अक्यूट आणि क्रॉनिक सायनासिसिटिसमध्ये नाकातून घट्ट पिवळा किंवा हिरवा द्रव निघणं, तसेच या द्रवांमार्फत रक्त किंवा पू येणं, श्वास घ्यायाला त्रास होणं ही देखील सायनसची लक्षणं आहेत.

सायनसची लक्षणं काय?

काही लोकांमध्ये, नाकाच्या हाडाचा आकार आपोआप वाढतो, ज्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. चेहऱ्याला किंवा नाकाला गंभीर दुखापत झाल्यास सायनसची धोका वाढतो. प्रदूषित वातावरणात राहणाऱ्या किंवा जास्त प्रमाणात सिगारेट ओढणाऱ्या लोकांमध्येही ही समस्या उद्भवते.

काय आहेत उपचार?

सायनसची गंभीर लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. सहसा हे इन्फेक्शन अँटिफंगल औषधांनी बरं होतं. साध्या औषधांनी बरा होत नसेल तर कॉर्टिकोस्टेरॉइड औषधं दिली जातात. या शिवाय नाक नेझल वॉशने स्वच्छ करण्यास सांगितलं जातं. एवढं करूनही रुग्ण बरा झाला नाही तर शेवटी सर्जरी केली जाते.

काळजी कशी घ्यावी?

नाकाला श्वसनाला त्रास होईल असे खाद्यपदार्थ, डिओ स्प्रे, एअर फ्रेशनर्स अशा गडद सुंगंधी वस्तूंपासून शक्यता तितके दूर राहणं योग्य आहे. जर तुम्हाला एसी रूम सोडून कडक उन्हात जावे लागत असेल तर बाहेर जाण्याच्या अर्धा तास आधी एसी बंद करा, अन्यथा तापमानात अचानक बदल झाल्याने सायनसची समस्या देखील होऊ शकते. जर तुम्हाला श्वसनाचा त्रास होत असेल, तर गरम पाण्याची वाफ घ्यावी. धूम्रपान आणि मद्यपान सेवनाचे प्रमाण कमी करावी. सायनसमध्ये तयार होणार म्युकस द्रव पातळ करण्यासाठी उबदार सूप आणि द्रव प्या. खोल श्वासोच्छवासाचा व्यायाम करा. महत्वाचं म्हणजे, ओल्या केसांनी पंखाखाली किंवा एअर कंडिशनरच्या समोर बसणे टाळा.

घरगुती उपचार काय?

सायनसवर कांदा आणि लसणाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर असतं. जे सर्दी , खोकला आणि सायनसच्या इन्फेक्शनवर गुणकारी ठरतं. तसेच कांद्याचा दर्प सायनसवर लाभदायक ठरतो. त्यासाठी कांदा आणि लसून पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याची वाफ घ्या. असं केल्यामुळे तुम्हाला सायनसच्या त्रासापासून आराम मिळेल. मेथीचे काही दाणे गरम पाण्यामध्ये उकळून प्यायल्याने सायनसचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!