Just another WordPress site

चिंता वाढली! आता कोरोनानंतरचा सर्वात मोठा धोका ‘सुपरबग’चा, वर्षभरात १ कोटी लोकांचा जाऊ शकतो जीव

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. दोन वर्षाममध्ये कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरियंटने करह केला. आता पुन्हा एकदा कोविड संसर्गाची नवी लाट पाहायला मिळतेय. त्यातच आता आणखी एका विषाणूनं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलंय. सध्या अमेरिकेत माणसांमध्ये वेगाने पसरणाऱ्या सुपरबग बॅक्टेरियाचा धोका निर्माण झालाय. या सुपरबगने गेल्या काही वर्षांत मेडिकल सायन्ससमोर एक मोठे आव्हान उभं केलंय.

खरंतर काही बॅक्टेरिया हे मानवासाठी अनुकूल असतात तर काही मानवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. सुपरबग हा देखील बॅक्टेरियाचाच एक प्रकार आहे. सुपरबगचं नाव मायकोप्लासमा जेनिटेलियम असं असून तो मानवांसाठी घातक आहे. सुपरबग हा बॅक्टेरिया सर्वात पहिल्यांदा १९८० मध्ये लंडनमध्ये सापडला होता. नंतर २०१९ मध्ये पहिल्यांदाच या आजारावर अमेरिकेत संशोधन सुरू झालं. हा जीवाणू, विषाणू आणि परजीवी यांचा एक प्रकार आहे. जेव्हा जीवाणू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी हे स्वत:ला वेळेनुसार बदलतात, तेव्हा औषध त्यांच्यावर परिणाम करणं थांबवतं. यामुळे त्यांच्यामध्ये प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता निर्माण होते. सध्या अमेरिकेत सुपरबग बॅक्टेरियामुळे मानवाला मोठा धोका निर्माण झालाय. त्यामुळे नव्या वर्षात सुपरबग हा कोरोनानंतरचा दुसरा सर्वात मोठा धोका असेल, अशी चिंता व्यक्त केली जातेय.
मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार, जर हा सुपरबग याच वेगाने पसरत राहिला तर दरवर्षी तब्बल १ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असं सांगण्यात आलंय. सध्या या सुपरबगमुळे जगभरात दरवर्षी १३ लाख लोकांचा मृत्यू होतोय. महत्वाचं म्हणजे, अँटीबायोटिक्स आणि अँटी-फंगल औषधे देखील सुपरबगवर कुठलाही परिणाम करत नाहीत, असं निरिक्षण लॅन्सेटच्या अभ्यासातून समोर आलंय.
सुपरबग हे कोणच्याही अँटीबायोटिक औषधांच्या वापरामुळे निर्माण होतो. डॉक्टरांच्या मते, फ्लू सारख्या विषाणूजन्य संसर्गाच्या बाबतीत अँटीबायोटिक्स घेतल्यास, सुपरबग होण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळं हळूहळू इतर मानवांना देखील संसर्ग होतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुष आणि स्त्री यांच्यातील लैंगिक संबंधादरम्यान या बॅक्टेरियाचा प्रसार होऊ शकतो. तसेच हा बॅक्टेरिया जन्मापूर्वी आईकडून बाळाकडे जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, सुपरबगच्या बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. हा बॅक्टेरिया मानवी शरीरात अनेक वर्षापर्यंत राहू शकतो. धक्कादायक बाब अशी की, सुपरबग हा इतर लैंगिक संक्रमित रोगांपेक्षा अधिक धोकादायक आहे. त्याची लक्षणे त्वरीत दिसत नसल्यामुळं त्याचे उपचार करणं देखील अवघड आहे. सुपरबगमुळे जननेद्रियांच्या भागांमध्ये रक्तस्त्राव, सूज आणि वेदना होऊ शकतात. तसेच, यामुळे महिलांमध्ये वंध्यत्व देखील येऊ शकते. तर २०२१ मध्ये, अमेरिकेतील १० हून अधिक संशोधनांमध्ये असं आढळून आले की सुपरबग्समुळे अकाली जन्माचा धोका वाढतो. दुसरीकडे, पुरुषांना लघवीशी संबंधित असलेल्या समस्याही वाढतात. याशिवाय, सध्या मानवांमध्ये होणाऱ्या सुपरबगच्या दीर्घकालीन दुष्परिणामांवर संशोधन केलंय जातंय. त्वचेचा संपर्क, जखमा, लाळ आणि लैंगिक संपर्काद्वारे सुपरबग हा आजार पसरू शकतो. सुपरबगवर सध्या बाजारात कोणतंही औषध उपलब्ध नाही, मात्र, योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास या आजारापासून आपण दूर राहू शकतो.

सुपरबगचा उद्रेक कसा टाळायचा?

– सुपरबग टाळण्यासाठी, प्रथम साबण आणि पाण्याने हात धुवा.
– हात धुण्यासाठी हँड सॅनिटायझर वापरा.
– खाद्यपदार्थ स्वच्छ ठिकाणी ठेवा.
– अन्न नीट शिजवून घ्या आणि स्वच्छ पाणी वापरा.
– आजारी लोकांच्या संपर्कात येणं टाळा.
– डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच कोणतेही अँटीबायोटिकचा वापर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!