Just another WordPress site

तिरूपती बालाजीची संपत्ती जाहीर, वाचा बालाजी देवस्थानची मालमत्ता तरी किती?

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी तिरुपती बालाजी देवस्थान एक आहे. तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक येत असतात. भाविकांकडून मंदिराला मोठ्या प्रमाणात देणगी दिली जाते. रोख रक्कम, सोनं चांदीसह अनेक गोष्टी मंदिराला दान केल्या जातात. त्यामुळे तिरुपती बालाजी मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा होतं असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने एकूण संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे. तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी यांनी मंदिराची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. तिरुपती बालाजी मंदिर देवस्थानाच्या देशात 960 मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत ८५,७०५ कोटी रुपये आहे. त्याशिवाय सोनं आणि एफडीच्या स्वरुपातही मंदिराची संपत्ती आहे.
राज्य सरकारच्या निर्देशांचे पालन करुन मागील विश्वस्त मंडळाने दरवर्षी संपत्ती आणि मालमत्तेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे २०२१ साली पहिली तर, यंदा दुसरी श्वेतपत्रिका काढण्यात आली आहे. दोन्ही श्वेतपत्रिका तिरुपती देवस्थानच्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत. त्यानुसार, तिरुपती मंदिराच्या देशात ९६० मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत ८५,७०५ कोटी रुपये आहे. याशिवाय, तिरूपती बालाजी देवस्थानाची विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये १४ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी आहेत. तर, १४ टन सोन्याचा साठाही देवस्थानाकडे आहे. त्यामुळे तिरूपती बालाजी देवस्थान जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. एका वेबसाईटने याबाबचे वृत्त दिले.
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!